जर तुम्ही हिवाळ्यात फॅमिली टाइम प्लॅन करत असाल(Konkan) तर नक्कीच कोकण हा ऑप्शन तुमच्यासाठी किफायतशीर आहे. मुंबई-पुण्यापासून एका दिवसाच्या ट्रिपमधून तुम्ही घरी परंतु शकता. अशात हिवाळ्यात कोकणाचं सौंदर्य वेगळंच खुलतं. थंड वारा, समुद्रकिनाऱ्यावरील शांत लाटा आणि हिरवागार निसर्ग, हे सगळं मिळून पिकनिकसाठी परफेक्ट वातावरण तयार करतं.

‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखलं जाणारं दापोली(Konkan) हिवाळ्यात थंड हवेसाठी उत्तम आहे. येथे मुरुद, हरणे आणि कर्दे बीचवर फॅमिली पिकनिकचा खास आनंद घेता येतो.

गणपतीच्या प्रसिद्ध मंदिरासोबतच गणपतीपुळ्यातील निळाशार समुद्र किनारा पर्यटकांना भुरळ घालतो. हिवाळ्यात इथलं हवामान मन मोहून टाकणारं असतं.

कोरल आयलंड्स, सिंधुदुर्ग किल्ला आणि स्वादिष्ट सीफूडसाठी प्रसिद्ध मालवण हिवाळ्यात पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे स्नॉर्केलिंग आणि स्कूबा डायव्हिंगचाही आनंद घेता येतो.

स्वच्छ समुद्रकिनारा आणि नारळाच्या झाडांनी वेढलेलं गुहागर हे शांतता शोधणाऱ्यांसाठी योग्य ठिकाण आहे. हिवाळ्यातील सूर्यास्त येथे पाहण्यासारखा असतो.

सह्याद्री पर्वतरांगेत वसलेलं आंबोली हे हिल स्टेशन हिवाळ्यात धुक्याने आच्छादित असतं. थंड हवामान, धबधबे आणि हिरवळ यामुळे हे ठिकाण फॅमिली पिकनिकसाठी आदर्श आहे.

हेही वाचा :

मेडिकल स्टूडेंट गर्लफ्रेंडसोबत OYOमध्ये गेला, गोळ्या खाल्ल्या अन्.. 
पत्नीची हत्या करून मृतदेह घरात पुरला अन्..
गोवर्धन असरानींना नक्की काय झालं होतं?, डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा