लखनऊ : मडियाव केशव नगर परिसरात ओयो हॉटेलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे फुजैल अहमद (वय 28) या मेडिकल(medical) विद्यार्थ्याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला आहे. फुजैल आपल्या गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये आला होता आणि काही वेळा गोळ्या खाल्ल्यामुळे तब्येत बिघडली, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

फुजैलने चीनमधून एमबीबीएस डिग्री पूर्ण केली होती आणि भारतात परत येऊन एमसीआय परीक्षेची तयारी करत होता. पोलिसांनी सांगितले की, फुजैलने ओयोमध्ये जाण्यापूर्वी हॉटेल मालकाला दोघे कपल असल्याचे सांगितले आणि लवकरच लग्न होणार असल्याचेही नमूद केले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले असून, पोस्टमॉर्टम अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. तरुणाने खाल्लेल्या गोळ्या कोणत्या प्रकारच्या होत्या आणि त्यामुळे मृत्यू झाला की अन्य कोणते कारण आहे, हे संशयास्पद आहे आणि तपासात पोलिस लक्ष देत आहेत.

सध्या ओयो हॉटेल आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज(medical) जप्त करून तपास सुरू आहे. तसेच, तरूणीची चौकशी लवकरच केली जाणार आहे, ज्यामुळे या घटनेच्या परिस्थितीची सविस्तर माहिती मिळेल.

हेही वाचा :

पत्नीची हत्या करून मृतदेह घरात पुरला अन्..
गोवर्धन असरानींना नक्की काय झालं होतं?, डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा
…म्हणून तिने बहिणीच्या प्रियकराचं गुप्तांग कापलं! रात्री 2 वाजता त्याच्या बेडरुममध्ये शिरली अन्..