हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं’ या एका संवादाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने ऐन दिवाळीत चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. श्वसनाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या असरानी यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.गेल्या काही दिवसांपासून असरानी यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना तातडीने जुहू येथील भारतीय आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांच्या फुफ्फुसात पाणी जमा झाल्याचे निदान(exactly) झाले.

त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र अखेर उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांचे व्यवस्थापक बाबूभाई थिबा यांनी दिली. त्याच दिवशी सायंकाळी सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.गोवर्धन असरानी यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. त्यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर आणि सहाय्यक भूमिकांमधूनही आपल्या अभिनयाची छाप (exactly)सोडली.
‘शोले’ मधील जेलरच्या भूमिकेबरोबरच ‘चुपके चुपके’, ‘अभिमान’ , ‘नमक हराम’ , ‘बावर्ची’ आणि ‘गुड्डी’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.१९६७ साली प्रदर्शित झालेल्या ‘हरे कांच की चुडियां’ या चित्रपटातून त्यांनी अभिनेता विश्वजीतच्या मित्राची भूमिका साकारत हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अलीकडच्या काळातही ते ‘हेरा फेरी’, ‘हलचल’, ‘वेलकम’ अशा अनेक चित्रपटांत दिसले. अभिनयासोबतच त्यांनी “आज की ताजा खबर” आणि “चला मुरारी हिरो बनने” या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते.
हेही वाचा :
कुरुंदवाड येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १२ जणांना अटक…
दिवाळीत सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी पनीर टोस्ट
रोहित शर्मा 8 आणि विराट शून्यावर बाद झाल्यानंतर गावसकरांची मोठी भविष्यवाणी