कुरुंदवाड : जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याचे कडक आदेश दिलेले असतानाही, शिरोळ तालुक्यातील आलास गावात दिवाळीच्या उत्साहात बेकायदेशीर तीन पत्त्यांचा जुगार अड्डा सुरू असल्याचे उघड झाले आहे. या अवैध धंद्यावर कुरुंदवाड पोलिसांनी (Police)छापा टाकून १२ जुगारींना रंगेहाथ पकडले असून, एकूण ₹२ लाख २७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना (Police)आलास येथील मेहबुब मुजावर यांच्या शेतातील गोठ्यामागे जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर खाडे आणि ज्ञानदेव सानप यांच्या पथकाने सायंकाळच्या सुमारास अचानक धाड टाकली. या कारवाईत स्वप्निल शहापुरे, शिवानंद मठपती, सहदेव कांबळे, किरण कांबळे, उमेश कोल्हापुरे, सुनिल कांबळे, हैदर दमामे, मेहबुब मुजावर, उमेश राजमाने, खलील गवंडी, सम्मत कडेगावकर आणि सुनील शिंगाडे या १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी जुगारासाठी वापरलेले ₹७,८०० रोख, तसेच चार मोटारसायकली (हिरो स्प्लेंडर – एमएच-५१-३९५३, बजाज डिस्कव्हर – एमएच-०९ बीव्ही ३६७८, बजाज डिस्कव्हर – एमएच-०९ बीवाय १३२०, हिरो स्प्लेंडर – एमएच-०९ बीके ०७१४) जप्त केल्या. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ₹२.२७ लाखांहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असले तरी, जिल्हा पोलीस प्रमुखांच्या स्पष्ट आदेशानंतरही आलाससारख्या गावात जुगार अड्डे चालू असल्याने पोलीस यंत्रणेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी या प्रकरणी अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कुरुंदवाड पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
हेही वाचा :
दिवाळीत सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी पनीर टोस्ट
रोहित शर्मा 8 आणि विराट शून्यावर बाद झाल्यानंतर गावसकरांची मोठी भविष्यवाणी
चित्रपटसृष्टीतून दुःखद बातमी समोर; प्रसिद्ध अभिनेत्याच निधन…