सर्वत्र दिवाळीची धामधूम असताना महाराष्ट्रात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मित्रासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार झाला आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. परभणीत ही खळबळजनक घटना घडली आहे.परभणीच्या जिंतूर तालुक्यातील भोगाव परिसरातील इटोली शिवारात 18 वर्षीय तरुणीवर (friend)सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेला सहा दिवस उलटले असून जिंतूर पोलीस ठाण्यात सहा आरोपी विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी जलद गतीने तपास करीत सहाच्या सहा आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली.

या मध्ये एक आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती आहे, 14 ऑक्टोबर रोजी एक तरुणी आणि तिच्या मित्रासोबत झाडाखाली (friend)गप्पा मारत बसले होते. त्यावेळी काही विकृत मनोवृत्तीच्या तरुणांनी त्यांना पकडत तरुणीवर अत्याचार केला. यावेळी तरुणीजवळ असलेली रोकड आणि इतर साहित्य देखील काढून घेतले. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
हेही वाचा :
करीना कपूरच्या दिवाळी पार्टीत आलियाच्या साडी लूकने वेधलं सर्वांच लक्ष…
आयुष्यात यश मिळवायचे आहे तर अंगी जपा ‘हा’ गुण; करिअरमध्ये होईल भरारी…
शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या पप्पांचा नाही’, रुपाली ठोंबरे संतापल्या…