धनत्रयोदशीच्या दिवशी उत्तरप्रदेशातील हरदोई येथे जत्रेमध्ये फिरणाऱ्या एका किशोरवयीन मुलीला सार्वजनिक ठिकाणी छेडछाड (Teasing)केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

ही घटना हरदोईतील कोतवाली शहर परिसरातील सिनेमा रोडवरील काशीनाथ गल्लीजवळ घडली. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठी गर्दी होती. त्या वेळी एका तरुणाने गर्दीचा फायदा घेत किशोरवयीन मुलीशी गैरवर्तन केले(Teasing). हा प्रकार रस्त्यावर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आणि नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला.
व्हिडीओमध्ये आरोपी तरुणीच्या मागे चालत असल्याचे आणि अचानक तिला स्पर्श करून चुंबन घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून केवळ तीन तासांत आरोपीला अटक केली. आरोपी मोहालिया शिवपार, कोतवाली देहात पोलिस स्टेशन, हरदोई येथील रहिवासी असल्याचे समोर आले.
उत्तप्रदेश
— Khanzar Sutra 'खंजर सूत्र' (@khanzarsutra) October 19, 2025
धनतेरस के मेले में व्यवस्था सुचारू रहे सुरक्षित रहे इसके भरपूर इंतजाम यूपी पुलिस ने किए थे , सब कुछ तारीफ के काबिल था पर हरदोई शहर में एक अधेड़ उम्र के व्यक्ति ने अपनी शर्मनाक हरकत के चलते रेशम में टाट के पैबंद बनने का काम कर दिया । एक इंस्टाग्राम पेज पर एक वीडियो… pic.twitter.com/pX8pIGoLwp
अटकेदरम्यान त्याने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला पकडले. या झटापटीत त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
हेही वाचा :
WhatsApp युजर्सना झटका! Meta ने घेतला मोठा निर्णय, ChatGPT च्या वापरावर लागणार ब्रेक
प्रसिद्ध गायकाची चौथी बायको लग्नाच्या वेळी 9 महिन्यांची होती गरोदर…
सीपीआरचे “आरोग्य” सुधारतय…