सांगलीत चिंतामणीनगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री मित्रांमध्ये दारू पिण्याच्या वादातून धक्कादायक खून (murder)घडला. रोहित लक्ष्मण आवळे (वय २४) या तरुणाचा मृत्यू झाला.माहितीप्रमाणे, रोहित आवळे काही मित्रांसोबत मध्यरात्री २ वाजता चिंतामणीनगरमधील मोकळ्या पटांगणावर दारू पिण्यास बसला होता. यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी दगडाने रोहित याच्या डोक्यावर प्रहार करून त्याचा निर्घृणपणे खून केला.

सद्यस्थितीत काही हल्लेखोरांची नावे पोलिसांसमोर आल्या असून, संजयनगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत आणि पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा :

आता एकाच दिवसात वटू लागले चेक, नव्या सिस्टिममधील किरकोळ अडचणी झाल्या दूर
100 लोकांनी एकाच वेळी आत्महत्या करण्याची परवानगी मागितली; कारण जाणून धक्का बसेल
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कृषी विभागाने घेतला मोठा निर्णय