हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते (actor)गोवर्धन असरानी यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विनोदी भूमिकांसाठी विशेष ओळखले जाणारे असरानी यांनी अनेक दशके आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवर्धन असरानी यांचे २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आजाराशी झुंज देत होते आणि गेल्या चार दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिक खालावली होती. त्यांना आरोग्य निधी ) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

फुफ्फुसांशी संबंधित आजाराने ते त्रस्त होते आणि उपचारांना शरीर साथ देत नसल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. राजस्थानमधील जयपूरचे रहिवासी असलेल्या असरानी यांच्या निधनाची (actor)बातमी त्यांचे व्यवस्थापक बाबूभाई थिबा यांनी दिली. बाबूभाई अनेक वर्षांपासून असरानी यांची सर्व कामे सांभाळत होते.
जयपूरच्या सेंट झेवियर्स येथून शिक्षण घेतलेल्या असरानी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९६७ साली एका गुजराती चित्रपटातून केली. त्यानंतर ‘हरे कांच की चुडीयां’ या हिंदी चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९७३ साली आलेल्या ‘नमक हराम’ मधील भूमिकेने त्यांना खरी ओळख मिळवून दिली.
‘शोले’चित्रपटातील ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ ही त्यांची भूमिका आजही अजरामर आहे. याव्यतिरिक्त त्यांनी ‘कोशिश’ , ‘बावर्ची’, ‘परिचय’ , ‘अभिमान’ , ‘मेहबूबा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. पुढे ‘जो जीता वही सिकंदर’, ‘हेरा फेरी’ , ‘गरम मसाला’ , ‘चुप चुप के’ , ‘भागम भाग’ आणि ‘बोल बच्चन’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी विनोदी अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
हेही वाचा :
करीना कपूरच्या दिवाळी पार्टीत आलियाच्या साडी लूकने वेधलं सर्वांच लक्ष…
आयुष्यात यश मिळवायचे आहे तर अंगी जपा ‘हा’ गुण; करिअरमध्ये होईल भरारी…
शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या पप्पांचा नाही’, रुपाली ठोंबरे संतापल्या…