बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री नोरा फतेही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी तिच्या डान्समुळे नव्हे तर लग्नाच्या चर्चेमुळे. ऐन दिवाळीच्या काळात नोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून तिचे चाहते अक्षरशः थक्क झाले आहेत. या फोटोंमध्ये नोरा एका कोरियन अभिनेत्यासोबत हळदीच्या(Haldi) विधीमध्ये सहभागी झाल्याचे दिसत आहे.

फोटोंमध्ये नोरा आणि कोरियन अभिनेता मिन हो दोघेही पिवळ्या रंगाचे पारंपरिक कपडे परिधान करून पोझ देताना दिसत आहेत. काही छायाचित्रांमध्ये त्यांच्या अंगावर हळद लावलेली देखील दिसते. या पोस्टला नोराने “नोरा-मिन हो हळद कार्यक्रम…” असे कॅप्शन दिले आहे.

यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे — “नोरा खरंच लग्न करतेय का?”, “हे शूटिंग आहे की खरं लग्न?”, “हे फोटो AI ने तयार केले आहेत का?” अशा असंख्य कमेंट्सनी नोराच्या पोस्टवर अक्षरशः पाऊस पडला आहे.

तथापि, नोराने अद्याप या फोटोंविषयी कोणतेही अधिकृत(Haldi) स्पष्टीकरण दिलेले नाही, त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम कायम आहे. काही जण हे आगामी प्रोजेक्टचे प्रमोशनल शूट असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत, तर काहींना वाटते की अभिनेत्री खरोखरच आंतरराष्ट्रीय लग्नबंधनात अडकली आहे.

हेही वाचा :

कुरुंदवाड येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १२ जणांना अटक…
दिवाळीत सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी पनीर टोस्ट
रोहित शर्मा 8 आणि विराट शून्यावर बाद झाल्यानंतर गावसकरांची मोठी भविष्यवाणी