उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील मौयमामध्ये एक अत्यंत विचित्र प्रकार घडला आहे. एका महिलेने बहिणीच्या प्रियकरावर हल्ला करून त्याचे गुप्तांग कापल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी महिलेच्या धाकट्या बहिणीशी प्रेमसंबंध संपुष्टात आणल्याने ती बहिणीच्या प्रियकरावर(boyfriend) नाराज होती. त्याच रागातून तिने या तरुणावर हल्ला केला. आरोपी महिलेचं नाव मंजू असे असून ती सध्या फरार आहे. ही घटना 16 ऑक्टोबरच्या रात्री मौयमा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलखानपूर गावात घडली आहे. पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पीडित 20 वर्षीय उमेश कुमार त्याच्या खोलीत झोपला होता तेव्हा त्याच्या मोठ्या भावाची पत्नी मंजूने चाकू घेऊन त्याच्यावर अनेक वार केले आणि नंतर त्याचे गुप्तांग कापण्याचा प्रयत्न केला. पीडित हा आरोपी महिलेचा दीर असल्याची माहिती समोर येत आहे.

उमेशच्या ओरडण्याने त्याचे कुटुंब जागे झाले. उमेशच्या मदतीसाठी घरातील सदस्यांनी धाव घेतली. मात्र घरातील दिवे लावून त्याच्या खोलीपर्यंत पोहचेस्तोवर उमेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. पीडित उमेशला ताबडतोब स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर आपत्कालीन उपचारांसाठी प्रयागराजमधील स्वरूप राणी नेहरू (एसआरएन) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उमेशवर एसआरएन रुग्णालयात दीड तासांची आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली. युरोलॉजी विभागातील डॉ. शिरीष मिश्रा यांनी उमेशचा जीव वाचल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र गुप्तांगावर झालेल्या जखमा पूर्ण बऱ्या होण्यासाठी 6 ते 8 महिने लागू शकतात असेही सांगितले. अजूनही तो वैद्यकीय देखरेखीखाली आहे.
तपासात असे आढळून आले की उमेश आणि मंजूची धाकटी बहीण मीना (नाव बदलले आहे) हे तीन वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. दोघांनी एकमेकांना लग्न करण्याचे वचन दिले होते. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांशीही चर्चा केली होती. मात्र तीन महिन्यांपूर्वी उमेशने अचानक हे नाते तोडले. मी दुसऱ्या कोणाच्या तरी (boyfriend)प्रेमात असल्याचं उमेशने ब्रेकअप करताना सांगितलं. ऐनवेळी प्रियकराने माघार घेतल्याने मीनाला मोठा मानसिक धक्का बसला आणि ती नैराश्येत गेली. मीनाने अगदी आत्महत्या करण्याचे विचारही बोलून दाखवले. उमेशमुळे आपल्या बहिणीची मानसिक स्थिती बिघडल्याचे पाहून मंजू संतापली. तिने याच रागातून हा हल्ला केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हल्ल्याच्या रात्री, मंजूने सर्वजण झोपेपर्यंत वाट पाहिली. स्वयंपाकघरातील चाकू घेऊन ती उमेशच्या खोलीत घुसली आणि हल्ला केला. हल्ल्यानंतर ती घटनास्थळावरून पळून गेली. पोलिसांनी सुरुवातीला एका अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, परंतु चौकशीदरम्यान, मंजूच्या जबाबातील तफावतींमुळे संशय निर्माण झाला. तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसा तिचा सहभाग स्पष्ट होत गेला. एसीपी विवेक कुमार यादव यांनी हल्ल्याबद्दलची माहिती दिली. “उमेशने तिच्या धाकट्या बहिणीशी संबंध तोडण्याच्या निर्णयाच्या रागातून मंजूने हल्ला केला. हा हल्ला म्हणजे बदला घेण्यासाठी केलेला नियोजित कट होता,” असं यादव म्हणाले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी मंजूचा शोध घेण्यासाठी अनेक पोलिस पथके तयार करण्यात आली असून ते ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.
मंजू गर्भवती असल्याने कोर्टात हा खटला उभा राहील तेव्हा त्याच्यावर परिणाम होईल अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. या हल्ल्यामुळे स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे. उमेशची प्रकृती स्थिर आहे, पण डॉक्टरांचे म्हणणे आहे की त्याला शारीरिक आणि भावनिक दुष्ट्या सावरण्यासाठी काही महिने लागतील.
हेही वाचा :
कुरुंदवाड येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १२ जणांना अटक…
दिवाळीत सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी पनीर टोस्ट
रोहित शर्मा 8 आणि विराट शून्यावर बाद झाल्यानंतर गावसकरांची मोठी भविष्यवाणी