ऐन दिवाळीनिमित्त कलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रसिद्ध अभिनेता(actor) आणि गायक ऋषभ टंडन यांचं बुधवारी (22 ऑक्टोबर) दिल्लीत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. दिवाळी साजरी करण्यासाठी ते कुटुंबीयांसोबत दिल्लीला गेले होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या माजी टीम मेंबरने दिली.

ऋषभ टंडन हा गायक, संगीतकार आणि अभिनेता म्हणून ओळखला जात असे. 2008 मध्ये टी-सीरिजच्या ‘फिर से वही’ म्युझिक अल्बमपासून त्याने करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘फकीर- लिव्हिंग लिमिटलेस’ आणि ‘रशना- द रे ऑफ लाइट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या. ‘आशिकी’, ‘चांद दू’, ‘धू धू कर के’, ‘फकीर की जुबानी’ यांसारखी त्याची गाणी खूप लोकप्रिय झाली.

ऋषभला (actor)प्राण्यांविषयी प्रचंड प्रेम होते. मुंबईतील घरात त्यांनी मांजरी, कुत्रे आणि पक्षी पाळले होते. त्यांच्या काही गाणी सध्या प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहेत आणि येत्या काळात प्रदर्शित होणार होत्या.त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही ऋषभ चर्चेत होते. अभिनेत्री सारा खान सोबत त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत्या, पण नंतर त्या चर्चांना शेवट आला. ऋषभने 2023 मध्ये रशियाच्या ओलेसिया नेडोबेगोवाशी लग्नगाठ बांधली. यावर्षी दोघांनी करवाचौथही साजरा केला होता, त्याचे फोटो ऋषभने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते.ऋषभच्या अचानक निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसह चाहत्यांमध्ये मोठा धक्का बसला आहे. कलाविश्वात शोककळा पसरली असून त्यांच्या योगदानाला श्रद्धांजली दिली जात आहे.

हेही वाचा :

Meta ने उचललं मोठं पाऊल! पालक मुलांच्या अकाऊंटवर ठेऊ शकतात नजर…
लाडक्या बहिणींची नाराजी दूर करणार, आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय!
कशी दिसते रणवीर-दीपिकाची मुलगी दुआ? पहिल्यांदाच दाखवला मुलीचा फोटो…