भारतीय रेल्वेने ऑनलाईन तिकिट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. त्यानुसार, आता 1 ऑक्टोबर 2025 पासून आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर व मोबाईल अ‍ॅपवरून बुकिंग सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या 15 मिनिटांत तिकिट आरक्षणासाठी आधार(Aadhaar) अधिप्रमाणन बंधनकारक करण्यात आले आहे. हा निर्णय ऑनलाईन तिकिट आरक्षणातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि सर्वसामान्य प्रवाशांना न्याय मिळावा, यासाठी घेण्यात आला असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरक्षित तिकिटे उघडण्याच्या पहिल्या दिवशी सामान्य तिकिट बुकिंगसाठी असलेली 10 मिनिटांची मर्यादा जशीच्या तशी राहणार आहे. या वेळेत कोणत्याही अधिकृत तिकिट एजंट्सना बुकिंग करण्याची परवानगी राहणार नाही. त्याचप्रमाणे, संगणकीकृत पीआरएस काउंटरवरून होणाऱ्या तिकिट बुकिंग पद्धतीतही कोणताही बदल होणार नाही.दरम्यान, हा नवा नियम केवळ बुकिंग सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या 15 मिनिटांसाठीच लागू असेल. या कालावधीत ऑनलाईन तिकिट घेऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना आधार(Aadhaar) क्रमांकाद्वारे अधिप्रमाणन करणे आवश्यक असेल. त्यानंतर मात्र नेहमीप्रमाणे आधार अधिप्रमाणनाशिवायही बुकिंग करता येईल.

रेल्वे प्रशासनाने सांगितले की, ऑनलाईन तिकिट प्रणालीत काही एजंट व बेकायदेशीर मार्गाने काम करणाऱ्या घटकांकडून मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत होता. त्यामध्ये अनेकदा सर्वसामान्य प्रवाशांना तिकीटे मिळण्यात अडचणी येत होत्या. हा गैरवापर थांबवून सामान्य प्रवाशांना सोयीस्कर रीतीने तिकीटे उपलब्ध व्हावीत, यासाठीच हा बदल करण्यात आला आहे.मध्य रेल्वेने, प्रवाशांना आवाहन केले आहे की, ते नवीन नियम लक्षात घेऊन आपली तिकिट बुकिंगची योजना आखावी. आधार अधिप्रमाणनामुळे प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होईल, असा विश्वासही रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.मुंबई ते अहमदाबाद भारतात पहिला बुलेट ट्रेन मार्ग जपानच्या मदतीने निर्माण होत असून लवरच या मार्गावर ट्रेन धावणार आहे.

त्यानंतर आता देशभरात बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे. कारण भारतात दुसऱ्या बुलेट ट्रेन मार्गाचं काम सुरू झालं असून १५०० किमी फक्त साडे सहा तासांत कापता येणार आहे. दिल्लीहून हावडापर्यंत ही ट्रेन धावणार आहे.मुंबई ते अहमदाबाद भारतात पहिला बुलेट ट्रेन मार्ग जपानच्या मदतीने निर्माण होत असून, लवकरच या मार्गावर ट्रेन धावणार आहे. त्यानंतर आता देशभरात बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे. कारण भारतात दुसऱ्या बुलेट ट्रेन मार्गाचं काम सुरू झालं असून १५०० किमी फक्त साडे सहा तासांत कापता येणार आहे. दिल्लीहून हावडापर्यंत ही ट्रेन धावणार आहे.

हेही वाचा :

नावाला आयुर्वेदिक स्पा सेंटर, आत भलताच प्रकार
ट्रायजेमिनल न्यूराल्जिया बद्दल सलमानने अखेर केला खुलासा
गॅस ग्राहकांसाठी महत्वाची माहिती….