महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने एक अत्यंत कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय. लैंगिक शोषण, अतिप्रसंग करणाऱ्या गुन्हेगारांना आता कारागृहातून बाहेर येणे कठीण होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या आग्रही मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात तातडीने कायदेशीर हालचाली सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली होती. गंभीर लैंगिक गुन्ह्यांतील दोषींना पॅरोलवर सोडण्यात येऊ नये, अशी स्पष्ट तरतूद कायद्यात असावी, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर गांभीर्याने चर्चा झाली, (women) त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय विभागाच्या सचिवांना यासंदर्भात आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयामुळे गंभीर गुन्हेगारांना मिळणाऱ्या सवलतींवर कायमची गदा येणार असून, गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होण्यास मदत होईल. आदिती तटकरे यांनी निवेदनात नमूद केले की, (women) अनेकदा बलात्कारासारख्या गुन्ह्यांतील आरोपी पॅरोलवर बाहेर आल्यानंतर पुन्हा तशाच प्रकारचे गुन्हे करतात, जे समाजासाठी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत घातक आहे. ही साखळी तोडण्यासाठी कठोर धोरणात्मक निर्णयाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
राज्यात महिलांच्या संरक्षणाबाबत कोणताही समझोता केला जाणार नाही, असा संदेश या निर्णयाद्वारे देण्यात आला आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील दोषींना पुन्हा समाजात मुक्तपणे वावरण्याची संधी मिळू नये, जेणेकरून पीडित महिलांना आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना निर्माण होईल. आदिती तटकरे यांच्या या मागणीमुळे आता गृह विभाग आणि विधी विभाग संयुक्तपणे नवीन नियमावली तयार करणार आहेत.
या कायदेशीर बदलामुळे केवळ गुन्हेगारांवर जरब बसणार नाही, तर समाजामध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत एक सकारात्मक विश्वासाचे वातावरण तयार होईल. (women) वारंवार घडणाऱ्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी ही तरतूद मैलाचा दगड ठरेल असे मानले जात आहे. भविष्यात अशा गुन्ह्यांतील दोषींना पॅरोल नाकारला गेल्यामुळे, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट होईल आणि गुन्हेगारांना कायद्याचा खरा दरारा अनुभवायला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा
आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल
लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद
मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?