महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात हाहाकार माजला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके पावसाने उद्ध्वस्त केली, तर शेतीची सुपीक मातीही वाहून गेली आहे. अनेक गावांना पुराचा वेढा बसला असून घरामध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे आणि अनेकांचे संसार अक्षरशः रस्त्यावर आले आहेत(Shiv Sena).

याचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना(Shiv Sena) (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पत्रकार परिषद घेतली. त्यांनी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी केली. पंजाबमध्ये हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळत असेल तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तशीच मदत का दिली जात नाही, असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, सरकारची मदत अत्यंत अपुरी आहे आणि आता शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसाही मिळू लागल्या आहेत.
मात्र शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, शिवसेना(Shiv Sena) त्यांच्या पाठीशी आहे, असे आश्वासन देतानाच बँकेच्या नोटिसा आमच्या कार्यालयात आणा, त्यावर आम्ही उपाय शोधू, असेही त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीवरूनही उद्धव यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत, आता सरसकट कर्जमाफी करावी, अन्यथा शिवसेना शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला.
हेही वाचा :
नावाला आयुर्वेदिक स्पा सेंटर, आत भलताच प्रकार
ट्रायजेमिनल न्यूराल्जिया बद्दल सलमानने अखेर केला खुलासा
गॅस ग्राहकांसाठी महत्वाची माहिती….