राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा अत्यंत चर्चेत आहे, विशेषतः मराठा समाजाच्या आंदोलनांपासून ते इतर मागासवर्गीयांच्या मागण्या यापर्यंत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बीड येथे बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणाबाबत ठाम आणि महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, आरक्षण फक्त जाती-धर्माच्या चौकटीतून पाहण्याचा विषय नाही; उलट, प्रत्येकाला त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार आणि खऱ्या गरजेनुसार आरक्षण मिळायला हवे. “ज्याला त्याच्या मागणीप्रमाणे आणि आर्थिक स्थितीप्रमाणे आरक्षणाची आवश्यकता असेल, त्याला आमचा कुठलाही विरोध नाही. पण काहीजण यामागे राजकारण करत असतील, तर त्यांना थांबवणं आवश्यक आहे,” असं त्यांनी सांगितलं(politics).

अजित पवार यांनी पुढे स्पष्ट केलं की, राजकारण करताना ते जात-पात किंवा नातेसंबंधांच्या आधारावर निर्णय घेत नाहीत, फक्त माणूस आणि त्याची गरज पाहतात. समाजात जातिवाद पसरवून लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचंही त्यांनी म्हटलं. “छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपण त्या विचारांचा आदर करायला हवा,” असं ते म्हणाले. तसेच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आधार घेऊन सांगितलं की, सगळ्यांचं रक्त लालच आहे आणि जातीच्या नावाने लोकांना भडकावणं थांबावं.

याआधी खासदार सुप्रिया सुळे यांनीही आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी म्हटलं की, आरक्षण फक्त त्यांनाच मिळावं ज्यांना खरी गरज आहे. “मी आरक्षणाची मागणी करू शकत नाही कारण माझे पालक सुशिक्षित आहेत, मी आणि माझी मुलंही सुशिक्षित आहोत. आरक्षण हे त्या लोकांसाठी आहे ज्यांना संधी मिळाली नाही, जे मागासलेले आहेत,” असे सुळे म्हणाल्या. या वक्तव्यांनंतर अजित पवारांनीही आर्थिक स्थिती हा महत्त्वाचा घटक असल्याचं अधोरेखित केलं आहे(politics).

हेही वाचा :

नावाला आयुर्वेदिक स्पा सेंटर, आत भलताच प्रकार
ट्रायजेमिनल न्यूराल्जिया बद्दल सलमानने अखेर केला खुलासा
गॅस ग्राहकांसाठी महत्वाची माहिती….