सावधान यंदा मान्सूनमध्येही घाम फुटणार? हवामान विभागने दिला ‘हा’ इशारा

आयएमडीच्या निकषांनुसार, एखाद्या ठिकाणचे कमाल तापमान सरासरीपेक्षा किमान ५ अंश सेल्सियसने जास्त राहून ती स्थिती सलग दोन दिवस टिकल्यास ‘हीटवेव्ह’ घोषित केली जाते, तर ७ अंशांनी वाढ झाल्यास ‘तीव्र उष्णतेची लाट’ घोषित होते.

उत्तर आणि मध्य भारतातील बहुतांश भागांमध्ये आठवडाभर चाललेल्या उष्णतेच्या लाटेचा मागील आठवड्यातील हलक्या ते मध्यम पावसामुळे शेवट झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) ताज्या अंदाजानुसार, पुढील किमान दोन आठवडे तरी उष्णतेची लाट परत येण्याची शक्यता कमी आहे. मात्र, हा दिलासा तात्पुरता असून येत्या काळात परिस्थिती पुन्हा बदलू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या मते, यंदा तापमान केवळ उन्हाळ्यातच नव्हे, तर मान्सून काळात आणि त्यानंतरही सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. विशेषतः मान्सूनच्या उत्तरार्धात पावसाचे प्रमाण घटल्यास देशात दीर्घकाळ तीव्र उष्णतेचा तडाखा बसू शकतो. (Weather) त्यामुळे पुढील काही महिन्यांत उष्णतेच्या लाटा वारंवार येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आयएमडीच्या निकषांनुसार, एखाद्या ठिकाणचे कमाल तापमान सरासरीपेक्षा किमान ५ अंश सेल्सियसने जास्त राहून ती स्थिती सलग दोन दिवस टिकल्यास ‘हीटवेव्ह’ घोषित केली जाते, तर ७ अंशांनी वाढ झाल्यास ‘तीव्र उष्णतेची लाट’ घोषित होते. प्रदेशाचे भौगोलिक स्वरूप आणि सामान्य तापमानही या घोषणेत विचारात घेतले जाते.

भारतामध्ये उत्तर-पश्चिम व मध्य भारत ते बिहार-झारखंडपर्यंतचा ‘कोर झोन’ आणि आंध्र प्रदेश-ओडिशा किनारपट्टी हे उष्णतेच्या लाटांचे प्रमुख पट्टे मानले जातात. कोर झोनमध्ये वरच्या वातावरणातील उच्च दाबामुळे हवा खाली येऊन तापमान वाढते, तर किनारपट्टी भागात समुद्राकडून येणारे थंड वारे अडथळले गेल्याने उष्णता वाढते. साधारणपणे हीटवेव्ह ४ ते ८ दिवस टिकते. (Weather)दरम्यान, ‘एल निनो’ प्रभाव यंदा मे ते जुलैदरम्यान तीव्र होण्याची शक्यता असून त्यामुळे भारतात पावसाचे प्रमाण घटण्याची आणि उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. इतिहासातही एल निनोनंतरच्या काळात उष्णतेच्या लाटा अधिक प्रमाणात आढळल्या आहेत.

सध्या देशातील २३ राज्ये उष्णतेच्या लाटेच्या प्रभावाखाली असून अनेक शहरांनी ‘हीट अ‍ॅक्शन प्लॅन’ राबवले आहेत. यात पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था, कामाच्या वेळांत बदल आणि दुपारच्या उन्हात बाहेरील कामांवर निर्बंध यांचा समावेश आहे. तरीही दरवर्षी शेकडो लोकांचा उष्माघातामुळे मृत्यू होत असून हजारो जण आजारी पडतात.
उष्णतेच्या लाटेला अद्याप अधिकृत ‘आपत्ती’चा दर्जा देण्यात आलेला नाही. १६व्या वित्त आयोगाने हीटवेव्ह आणि विजेच्या कडकडाटाला आपत्तीमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे. (Weather)त्याला मान्यता मिळाल्यावर राज्यांना आपत्ती निवारण निधीतून मदत देणे सुलभ होईल.
सर्वाधिक प्रभावित हवामान उपविभागांतील उष्णतेच्या लाटेचे दिवस
विभाग २०२४ २०२५
पश्चिम राजस्थान. २९ ३३
पूर्व मध्य प्रदेश २६ १०
विदर्भ ११ ८
पश्चिम मध्य प्रदेश २४ ७
पूर्व राजस्थान २३ २१
ओडिशा ३७ ७
पूर्व उत्तर प्रदेश ३३ ८
हरियाणा, चंदीगड व दिल्ली ३० ११
सौराष्ट्र व कच्छ १६ १५
पश्चिम उत्तर प्रदेश ३२ ५
अतिउष्णतेचा GDP फटका ! गर्मीच्या लाटेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर संकट; वीज आणि रोजगारावरही परिणाम
सर्वाधिक उष्णतेमुळे मृत्यू नोंदवणारी राज्ये
राज्य २०१८ २०१९ २०२० २०२१ २०२२
पंजाब ३८ ९० ११० ९१ १५०
उत्तर प्रदेश १७६ ११७ ५० ३५ १५०
तेलंगणा १०७ १५६ ९८ ४३ ६२
बिहार. ६४ २१५ ५३ ५७ ७८
महाराष्ट्र १२८ १५९ ५६ ३७ ९०
आंध्र प्रदेश ९७ १२८ ५० २२ ४७
झारखंड ४२ ८८ २३ ३३ ४७
ओडिशा ४० ८४ १३ १५ ३८
हरियाणा ५६ ४६ २३ १४ २७
मध्य प्रदेश. १५ ३३ ७ २ २७

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?