ठाकरेंच्या शिवसेनेने आपली 58 वर्षाची शिवतेर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा सुरू ठेवत आज (2 ऑक्टोबर) सायंकाळी सात वाजता संस्कृती आणि परंपरा जपत दसऱ्याच्या(politics) निमित्ताने शस्त्र पूजन आणि सोने वाटप कार्यक्रम होईल. ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात सुरुवातीला काही नेत्यांची भाषणे होतील आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण होईल.

त्यामुळे दसरा मेळाव्याच्या(politics) निमित्ताने एक प्रकारे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. मनसे युती संदर्भात उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून काय बोलतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे मेळाव्याच्या निमित्ताने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये नव्याने उत्साह भरतील.
यंदाचा दसरा मेळावा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी का महत्त्वाचा?
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई
दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढल्यानंतर होणारा हा पारंपरिक दसरा मेळावा
दोन्ही भावांची जवळीक वाढली मात्र राजकीय युतीही होणार का? याचे संकत देणारा मेळावा, मनसे युती संदर्भात स्पष्टता उद्धव ठाकरे आजच्या भाषणात आणू शकतात.
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीचा काय?
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना काय सूचना देणार?
शिंदेंकडून ठाकरे गटाला पाडले जात असलेले खिंडार शिंदे गटात होत असलेले पक्ष प्रवेश यावर भाष्य उद्धव ठाकरे करू शकतात.
राज्यातली पूरपरिस्थिती- शेतकऱ्यांना मिळत असलेली अपुरी मदत,मेळावा रद्द करून उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्तांना मदत करावी भाजपने मांडलेली भूमिका. केंद्राकडून शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा…
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान झालेला क्रिकेटचा सामना
सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती, मुंबईतील विविध प्रश्न या सगळ्यांवर उद्धव ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे
हेही वाचा :
न्यूझीलंडच्या पराभवामुळे टीम इंडियाला झटका, महिला ब्रिगेडसोबत विजयी सुरुवातीनंतर काय झालं?
ना देव, ना मानव, ना दानव… अशक्य! तेव्हा अवतार घेतला ‘त्या’ आदिमायेने! मारला महिषासुर…