आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे.(decision)एसटी महामंडळाने 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात येणार होती. पण या भाडेवाढवरुन सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. जनभावना ओळखून सरकारने हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हंगामी भाडेवाढ मागे घेत असल्याची मोठी घोषणा केली. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाने महाराष्ट्रातील जनतेला आता नेहमीच्या भाडेनुसार एसटीचा प्रवास करता येणार आहे. यामुळे ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दिवाळी निमित्त 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या काळासाठी एसटीकडून हंगामी भाडेवाढ करण्यात येणार होती. ही भाडेवाढ तब्बल 10 टक्के इतकी होती. पण यामुळे राज्यभरात नाराजी व्यक्त केली जात होती.(decision) ग्रामीण भागातील जनता ही सर्वाधिकपणे एसटी बसने प्रवास करते. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राला त्याचा फटका बसला असता. याशिवाय एसटी बसने गावी जाणाऱ्या शहरी भागातील नागरिकांनादेखील यामुळे जास्तीचे पैसे मोजावे लागले असते. अखेर सरकारने हंंगामी भाडेवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी दिवाळीला हंगामी भाडेवाढ केली जाते. त्यामुळे यावर्षीदेखील ती करण्यात येणार होती. पण राज्यात सध्या ओला दुष्काळ पडला आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. घरांची पडझड झाली आहे. गावात, घरात पाणी शिरलं आहे. (decision)अनेक घरांमध्ये चिखलाचं सम्राराज्य आहे. अशा या संकट काळात महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा उभं करण्याचं मोठं आव्हान सरकार पुढे आहे.

राज्यातील जनता इतक्या अडचणीत असताना एसटीची भाडेवाढ करणं त्यांना परवडणार नाही. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाडेवाढ मागे घेण्याची सूचना परिवहन विभागाला केली होती. त्यानुसार परिवहन मंत्र्यांनी एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.”एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे महामंडळाला ३० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र यंदा राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेवून अपवाद म्हणून महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
हेही वाचा :
‘या’ बँकांच्या FD मध्ये आगाऊ गुंतवणूक करा,
नवरात्रीनंतर कलशात ठेवलेल्या नारळाचे काय करावे?
समाजाच्या सहयोगामुळेच संघाचा शताब्दी पर्यंतचा प्रवास सुखकर झाला