टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत विजयी(India) सुरुवात केली. मात्र त्यानंतरही टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे.

टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात 30 सप्टेंबरला(India) आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात विजयी सुरुवात केली. यजमान टीम इंडियाने श्रीलंकेवर गुवाहाटातील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये डीएलएसनुसार 59 धावांनी मात केली. त्यानंतर या स्पर्धेतील दुसरा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात आपण गतविजेता का आहोत? हे दाखवून दिलं. ऑस्ट्रेलियाने बॅटिंगनंतर बॉलिंगच्या जोरावर कमाल केली आणि स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर 89 धावांनी मात केली. न्यूझीलंडचा हा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा 2017 नंतरचा एकदिवसीय क्रिकेटमधील सलग 16 वा विजय ठरला. न्यूझीलंडच्या या पराभवामुळे टीम इंडियाला फटका बसला.

ऑस्ट्रेलियाने या विजयासह टीम इंडियाला मागे टाकलं. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पछाडत पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. तर टीम इंडियाची दुसर्‍या स्थानी घसरण झाली.

सामन्यात काय काय झालं?
ऑस्ट्रेलियाने एश्ले गार्डनर हीच्या शतकी खेळीच्या जोरावर 320 पार मजल मारली.(India)एश्ले गार्डनर हीने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक 115 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाला पूर्ण 50 ओव्हर खेळता आलं नाही. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 49.3 ओव्हरमध्ये 326 रन्स केल्या.

प्रत्युत्तरात न्यूझीलंडसाठी कॅप्टन सोफी डिव्हाईन हीने एकाकी झुंज दिली. एकटी सोफी न्यूझीलंडला जिंकवण्यासाठी लढली. मात्र तिला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. सोफीने 112 धावांचं योगदान दिलं. मात्र तिला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. सोफीचा अपवाद वगळता आणि 326 धावांचा विजयी आकडा पाहता इतरांना काही खास योगदान देता आलं नाही. किवींच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियासमोर गुडघे टेकले. न्यूझीलंडचं अशाप्रकारे 43.2 ओव्हरमध्ये 237 रन्सवर पॅकअप झालं.

ऑस्ट्रेलियाने यासह 89 धावांनी हा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने यासह 2 पॉइंट्स मिळवले. तसेच ऑस्ट्रेलियाला मोठ्या फरकाने सामना जिंकल्याचा फायदा नेट रनरेटमध्ये झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पछाडत पहिल्या स्थानी झेप घेतली. ताज्या आकडेवारीनुसार, ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट हा 1.780 असा झाला आहे. तर टीम इंडियाच्या खात्यातील नेट रनरेट हा 1.255 असा आहे. तर न्यूझीलंड तिसर्‍या स्थानी आहे.

हेही वाचा :

‘या’ बँकांच्या FD मध्ये आगाऊ गुंतवणूक करा,

नवरात्रीनंतर कलशात ठेवलेल्या नारळाचे काय करावे?

समाजाच्या सहयोगामुळेच संघाचा शताब्दी पर्यंतचा प्रवास सुखकर झाला