आज एका अशा भारतीय क्रिकेटपटूचा(cricketer) वाढदिवस आहे जो त्याच्या स्विंग गोलंदाजीसाठी विशेष लोकप्रिय आहे. हा खेळाडू आहे प्रवीण कुमार! भारतीय क्रिकेटपटू प्रवीण कुमारचा जन्म 2 ऑक्टोबर 1986 रोजी उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे झाला. स्विंगचा मास्टर म्हणून नावाजलेला हा वेगवान गोलंदाज एका घरगुती सामन्यातील भांडणानंतर वादात सापडला आणि त्याला ‘सिरफिरा’ आणि ‘पागल’ ठरवण्यात आले.

कॉर्पोरेट ट्रॉफीतील एका सामन्यात प्रवीण कुमार(cricketer) ओएनजीसीकडून खेळत होता, तर अजीत अर्गल आयकर विभागाच्या संघाकडून खेळत होते. या सामन्यातील 49व्या षटकादरम्यान प्रवीण आणि अजीत यांच्यात जोरदार वाद झाला. प्रवीणच्या आक्रमक बॉलिंगनंतर अजीतने अंपायरकडे नो-बॉलची तक्रार केली.

यामुळे संतापलेल्या प्रवीणने थेट फलंदाजावर ओरडायला सुरुवात केली. या भांडणात अंपायरलाही शिवीगाळ सहन करावी लागली. या वादानंतर मॅच रेफरीनं प्रवीणला ‘मानसिकदृष्ट्या फिट नाही’ आणि ‘पागल क्रिकेटर’ अशी शिक्कामोर्तब केली.

या घटनेनंतर प्रवीण कुमारने स्वतःच कबूल केले होते की, काही काळ त्याने घराबाहेर पडणेही बंद केले होते. त्याला भीती वाटत होती की लोक काय प्रश्न विचारतील आणि कशा नजरेने पाहतील. पण नंतर त्याने स्वतःला सावरले, मैदानावर परतला आणि नकारात्मकतेतून बाहेर आला.

IPL-7 मध्ये सुरुवातीला प्रवीण कुमारला संधी मिळाली नव्हती. यामुळे तो निराश झाला होता. पण मुंबई इंडियन्सचा अनुभवी गोलंदाज झहीर खान दुखापतीमुळे बाहेर पडल्यावर प्रवीणला संघात घेतले गेले. मैदानावर उतरताच त्याने दोन विकेट घेत आपल्या पुनरागमनाची जोरदार छाप सोडली.

2007 मध्ये पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या प्रवीण कुमारने भारतासाठी 68 वनडे आणि 6 कसोटी सामने खेळले. वनडेमध्ये त्याने 77 विकेट्स घेतल्या, ज्यात 31 धावांत 5 विकेट्स हे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. कसोटीत त्याचा सर्वोत्तम बेस्ट 106 धावांत 5 विकेट्स असा आहे.

प्रवीण कुमारचे करिअर एकंदरीत उल्लेखनीय राहिले, पण मैदानावरचा राग, वाद आणि त्यातून मिळालेली ‘सिरफिरा’ आणि ‘पागल’ ही प्रतिमा त्याच्या क्रिकेट प्रवासावर मोठा डाग ठरली. आज प्रवीण कुमारचा वाढदिवस, पण त्याची आठवण क्रिकेटप्रेमींना कायम एका उत्तम स्विंग गोलंदाजासोबतच मैदानावरील वादासाठीही राहणार आहे.

हेही वाचा :

न्यूझीलंडच्या पराभवामुळे टीम इंडियाला झटका, महिला ब्रिगेडसोबत विजयी सुरुवातीनंतर काय झालं?

आनंदाची तोरणे बांधू दारी, रांगोळीने सजवू अंगण…! दसऱ्यानिमित्त सोन्यासारख्या प्रियजणांना द्या भरभरून शुभेच्छा

ना देव, ना मानव, ना दानव… अशक्य! तेव्हा अवतार घेतला ‘त्या’ आदिमायेने! मारला महिषासुर…