दसऱ्याला विजयादशमी असे सुद्धा म्हणतात. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील(festival) दहाव्या दिवशी दसरा सण साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी केला जातो.


दसऱ्यानिमित्त सोन्यासारख्या प्रियजणांना द्या भरभरून शुभेच्छा

साडेतीन मुहुर्तांपैकी एक म्हणजे दसरा. हिंदू धर्मात सर्वच सणांना विशेष महत्व आहे.(festival) दसऱ्याला विजयादशमी असे सुद्धा म्हणतात. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दहाव्या दिवशी दसरा सण साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी केला जातो. महाराष्ट्रात दसऱ्याला आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून एकमेकांना दिली जातात. त्यानंतर सरस्वती पूजन व शस्त्रपूजा देखील केली जाते. यादिवशी सोनं चांदीचे दागिने सुद्धा खरेदी केले जातात. म्हणूनच लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही खास शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचून सगळ्यांचं खूप आनंद होईल.
दसरा ते दिवाळीपर्यंत ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांची यादी, जाणून घ्या
सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवण,
सोन्यासारख्या लोकांना,
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आला आला आला दसरा,
सोनं एकमेकांस वाटण्याचा..
उणे वाईट दहन करून,
फक्त आनंद लुटण्याचा..
हॅप्पी दसरा !

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

सोनं वाटण्याइतका(festival) मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
सोन्यासारखे तुम्ही आहातच..
सदैव असेच राहा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

विजय मिळवला म्हणूनी,
साजरी विजयादशमी..
झेंडूफुलांच्या माळा रंगीत,
शोभती घरोघरी, वाहनी..
दसऱ्याच्या व विजयादशमी च्या
हार्दिक शुभेच्छा!

आंब्याच्या पानांची केली कमान,
अंगणात काढली रांगोळी छान,
आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा,
आपट्याची पाने देऊन करा साजरा..
दसरा व विजयादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा!

साडेतीन मुहूर्तांपैकी एक,
दसरा हा सण विजयाचा..
देवीने केला वध असूराचा,
दिन पराक्रमाचा, पौरुषाचा
दसरा व विजयादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा!

वाईटांवर चांगल्याची मात
महत्त्व या दिनाचे असे खास
जाळोनिया द्वेष – मत्सराची कात
मनोमनी वसवी प्रेमाची आस
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आनंदाची तोरणे बांधू दारी,
रांगोळीने सजवू आंगण
विजयोत्सवाचा दिवस आपुला,
करु आनंदाचे सिमोल्लंघन
विजयादशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा!

जल्लोष विजयाचा..
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त
सण हा दसऱ्याचा.
दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा

सुख, समृद्धी, शांती आणि
यशाच्या शुभेच्छांसह,
दसऱ्याच्या पवित्र
सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपट्याच्या पानांची
होते देवाणघेवाण..
प्रेमाचा ओलावा करुनी दान..
शुभ दसरा..!

दसऱ्याचा हा पवित्र सण
तुमच्या घरात अपार आनंद आणो
भगवान श्रीराम तुमच्यावर
व तुमच्या परिवारावर
सुखाचा वर्षाव करोत
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा

दु:खाच्या काळोखाला हरवून टाका कायमचे,
आनंद आणि यश तुमच्या जीवनात फुलू दे रोजचे!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्ही यशस्वी व्हा, असो तुमचं भाग्य खास,
तुमच्या वाटेवर फुलू देत नव्या स्वप्नांचा प्रवास.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

साडेतीन मुहूर्तांपैकी एक,
दसरा हा सण विजयाचा..
देवीने केला वध असूराचा,
दिन पराक्रमाचा, पौरुषाचा
दसरा व विजयादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा!

हेही वाचा :

‘या’ बँकांच्या FD मध्ये आगाऊ गुंतवणूक करा,

नवरात्रीनंतर कलशात ठेवलेल्या नारळाचे काय करावे?

समाजाच्या सहयोगामुळेच संघाचा शताब्दी पर्यंतचा प्रवास सुखकर झाला