१२ वर्षांपासून बंद असलेल्या काळम्मावाडी धरणस्थळावरील (Dam)उद्यानाचा आता कायापालट होणार असून पर्यटकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरत आहे. देखभाल आणि व्यवस्थापनाच्या अभावामुळे अवकळा आलेले हे उद्यान पुन्हा नव्या रूपात उभे राहणार आहे. प्रस्तावित नूतनीकरण योजनेमुळे काळम्मावाडी परिसरात पर्यटनाला नवी चालना मिळणार असल्याचे चित्र आहे.पर्यटन क्षेत्रातील ‘ड्रीम प्रोजेक्ट’ मानल्या जाणाऱ्या या योजनेला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नातून गती मिळाली आहे. आगामी काळात जिल्ह्यासह राज्यातील पर्यटकांसाठी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक उद्यान विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेसाठी जिल्हा नियोजन मंडळातून तब्बल सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राधानगरी, काळम्मावाडी आणि दाजीपूर परिसराच्या पर्यटन विकासाला मोठा हातभार लागणार आहे.

काळम्मावाडी धरणस्थळावरील हे उद्यान १९९० साली विकसित करण्यात आले होते.(Dam) जलतरण तलाव, बालोद्यान आणि विविध मनोरंजन सुविधांमुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत होती. मात्र, कालांतराने योग्य देखभाल आणि तंत्रशुद्ध व्यवस्थापनाअभावी उद्यानाची अवस्था खालावली. अखेर धरण सुरक्षिततेच्या कारणास्तव २०१२ मध्ये हे उद्यान पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते.
आता या उद्यानाच्या नूतनीकरणासाठी आकर्षक आणि आधुनिक (Dam)आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रस्तावित योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली असून निधीची तरतूदही पूर्ण झाली आहे. लवकरच या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच काळम्मावाडी धरण परिसर नव्या रुपात पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज होणार आहे.
हेही वाचा
कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट
महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?