सात तासांचा टायमर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल जिवंत बॉम्ब रात्रभर पुण्यात घडलं काय?

पुण्यात रात्रभर बॉम्ब सदृश्य वस्तूने एकच खळबळ उडवून दिली. हडपसर परिसरातील एका नामांकित हॉस्पिटल परिसरात टायमर आणि स्फोटके आढळल्याने पोलिसांसह सर्वांची झोप उडाली.

पुणे काल मध्यरात्री वेठीस धरल्या गेले. हडपसर परिसरातील कामधेनु इस्टेटमधील एका नामांकित सुपर स्पेशालिस्ट खासगी रुग्णालयात बॉम्ब सदृश्य वस्तूने खळबळ उडाली. हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये एक जिवंत बॉम्ब आढळला. टायमरसह स्फोटके लावण्यात आल्याचे समोर आले. (Pune) त्यामुळे भीतीचे वातावरण तयार झाले. तातडीने पोलिसांना ही माहिती देण्यात आली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले.

संशयास्पद सर्किट आणि टायमर असलेली पांढऱ्या रंगाची वस्तू नागरिकांनी पाहिली. त्यांनी पोलिसांना लागलीच कळवले. (Pune) या बॉम्बमध्ये सात तासांचा टायमर सेट केलेला होता. बॉम्ब शोधक व नाशक पथक तातडीने दाखल झाले. टायमरवर उरलेला वेळ पाहून पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ परिसरात नाकेबंदी केली. या घटनेमुळे रुग्ण, नातेवाईक, कर्मचारी आणि आजूबाजूची रहिवाशी भीतीच्या सावटाखाली होते.

टायमर लावलेला जिवंत बॉम्ब हा लो ग्रेड आयईडी असल्याचे निष्पन्न झाले. स्फोटकं लावून त्याला सर्किट आणि टायमर लावल्याचे तपासात उघड झाले. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही वस्तू ताब्यात घेतली. हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या मैदानात नेऊन ती यशस्वीरित्या निकामी करण्यात आली. पण हा जिवंत बॉम्ब ठेवण्यामागे कुणाचा हात आहे, त्याने हे कृत्य का केले याचा पोलीस तपास घेत आहेत.

सीसीटीव्हीत जिवंत बॉम्ब ठेवणारी व्यक्ती कैद झाल्याचा दावा करण्यात येत आहे. ही संशयित व्यक्ती एका इलेक्ट्रिक स्कूटरवरून आली होती. (Pune) रस्त्यांवरील सीसीटीव्ही आधारे पोलीस आता त्याचा शोध घेत असल्याचे समजते. हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेजचीही कसून तपासणी करण्यात येत आहे. ही व्यक्ती ताब्यात आल्यानंतर या घटनेमागील सर्व बाबी समोर येतील. तपासासाठी पोलिसांची तीन पथकं स्थापन करण्यात आली आहेत. स्थानिक पोलीस, पुणे शहर गुन्हे शाखा पथक आणि एटीएस असे तीनही पथकं या घटनेचा तपास करत आहेत. संशयीताला लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा

सर्वसामान्यांची झोप उडवणारी बातमी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार, RBI ने दिले संकेत

देवेंद्र फडणवीस यांचा तडकाफडकी मोठा निर्णय, आता सर्वच मंत्री हालचाली वाढल्या!

रेल्वे नोकर भरती आंदोलन प्रकरण राज ठाकरे कोर्टात हजर, न्यायालयात नेमकं काय घडलं?