जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भूराजकीय संघर्षाचा थेट फटका आता इंधन बाजाराला बसू लागला आहे. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलासह एलपीजी (LPG), सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) दरांमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती जाहीर झाल्या असून, ग्राहकांचे याकडे लक्ष लागले आहे.

अमेरिका (America) आणि इराण (Iran) यांच्यात भडकलेल्या युद्धामुळे जगभरात ऊर्जेची मोठी टंचाई जाणवत आहे. पश्चिम आशियातील (West Asia) या अशांततेमुळे इंधनाची पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, भारतासारख्या (India) देशालाही याचा मोठा फटका बसण्याची भीती आहे. वॉशिंग्टनने (Washington) तेहरानचा (Tehran) शांततेचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर, (gas cylinder) आता भारताने गॅस पुरवठ्यासाठी संयुक्त अरब अमिरातीशी (United Arab Emirates) एक नवा करार करण्याचे निश्चित केले आहे. सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आखाती देशावर जोरदार टीकास्त्र सोडताना सध्याची शस्त्रसंधी पूर्णपणे संपुष्टात आल्याचे जाहीर केले.
ट्रम्प यांनी इराणच्या शांतता प्रस्तावाला ‘कचरा’ असे संबोधून तो अजिबात मान्य नसल्याचे ठणकावून सांगितले. या कठोर भूमिकेमुळे दोन देशांमधील वाद शिगेला पोहोचला असून भविष्यातील शांततापूर्ण तोडग्याच्या आशा मावळल्या आहेत. (gas cylinder) याच जागतिक घडामोडी आणि कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमतींमुळे चलन बाजारातही मोठी पडझड पाहायला मिळत आहे. बुधवारी भारतीय रुपया (Indian Rupee) अमेरिकन डॉलरच्या (US Dollar) तुलनेत कमकुवत होऊन ९५.७३ रुपयांवर उघडला, जो आदल्या दिवशी ९५.७१ वर बंद झाला होता. या सर्व बाह्य घडामोडींमुळे भारतीय नागरिक गॅस दरांबाबत सरकारच्या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
देशातील विविध प्रमुख शहरांमध्ये गॅसचे दर निश्चित करण्यात आले आहेत. नवी दिल्लीत (Navi Delhi) १४.२ किलोचा घरगुती गॅस ₹९१३.०० तर व्यावसायिक गॅस ₹३,०७१.५० ला मिळत आहे. मुंबई (Mumbai) (₹९१२.५०/₹३,०२४.००), कोलकाता (Kolkata) (₹९३९.००/₹३,२०२.००), चेन्नई (Chennai) (₹९२८.५०/₹३,२३७.००), बंगलोर (Bangalore) (₹९१५.५०/₹३,१५२.००), असे दर लागू आहेत. हॉटेल व्यावसायिकांसाठी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत पूर्वी झालेल्या ₹९९३ च्या वाढीमुळे त्याचे दर ३,०७१.५० रुपयांवर पोहोचले असून, या महागाईचा ताण लघुउद्योजकांवर कायम आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरवठ्याबाबत अनिश्चितता असूनही, १३ मे रोजी भारतातील घरगुती गॅसचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. घरगुती वापराच्या १४.२ किलो सिलिंडरच्या किमतीत गेल्या ७ मार्च रोजी ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती, त्यानंतर त्यात कोणताही नवा बदल झालेला नाही. (gas cylinder) दरम्यान, ५ किलो वजनाचे ‘एफटीएल’ (FTL) सिलिंडर खुल्या बाजारात आता अधिक महागड्या दराने विकले जात आहेत. या छोट्या सिलिंडरची किंमत ५४९ रुपयांवरून थेट ८१०.५० रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे, ते मोठ्या घरगुती सिलिंडरच्या तुलनेत फारसे स्वस्त राहिलेले नाहीत.
हेही वाचा
सर्वसामान्यांची झोप उडवणारी बातमी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार, RBI ने दिले संकेत
देवेंद्र फडणवीस यांचा तडकाफडकी मोठा निर्णय, आता सर्वच मंत्री हालचाली वाढल्या!
रेल्वे नोकर भरती आंदोलन प्रकरण राज ठाकरे कोर्टात हजर, न्यायालयात नेमकं काय घडलं?