कोथरूड आणि बावधन परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर दूषित पाण्याचा (water)गंभीर परिणाम होत आहे. दसऱ्यानंतर या भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने, पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर घरांमध्ये गढूळ आणि दूषित पाणी येऊ लागले. परिणामी, गेल्या दहा दिवसांपासून अनेक नागरिकांना उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि तापाचा त्रास जाणवू लागला आहे

उजवी आणि डावी भुसारी कॉलनी, वेदभवन परिसर, इंदिरा शंकरनगरी, सौदामिनी आणि मोकाटेनगर या भागांतील नागरिकांना या त्रासाचा सर्वाधिक फटका बसला आहे. स्थानिक नागरिकांनी दूषित पाण्याची तक्रार महापालिकेकडे केली असली तरी सुरुवातीला संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने आणि पाणीपुरवठा विभागाने तातडीने पाहणी मोहीम हाती घेतली असून, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. प्राथमिक अहवालात पाणी(water) दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या महापालिकेकडून नागरिकांना पिण्याचे पाणी किमान २० मिनिटे उकळूनच वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, सुतार रुग्णालय (कोथरूड), वेडेपाटील रुग्णालय (बावधन), वीर सावरकर दवाखाना (उजवी भुसारी कॉलनी) आणि शांतिबन सोसायटी येथील महापालिकेच्या दवाखान्यांत उपचार सुरू आहेत. अनेक नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींना ताप, खोकला आणि थंडीचा त्रास जाणवत आहे.महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाणीपुरवठा वाहिनीची तपासणी सुरू आहे आणि दूषित पाण्याचा स्रोत शोधून त्यावर तातडीने कारवाई केली जाणार आहे.
हेही वाचा :
सावधान! आज ‘या’ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
माकडांचा हल्ला अन् वडिलांसमोर थेट छतावरुन खाली पडली चिमुकली VIDEO VIRAL…
व्हॉट्सअॅप वापरुन बना श्रीमंत! दरमहा लाखो रुपये कमवण्याचे ५ स्मार्ट मार्ग