सोशल मीडियावर जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कुठे काय घडतं आहे हे आपल्याला सोशल मीडियामुळे घरबसल्या कळते. सध्या सोशल मीडियावर उत्तरप्रदेशच्या हाथरसमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे की, हाथरस येथे माकडांची दहशत पसरली आहे. माकडांनी २ वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला(attack) केला होता. ज्यामुळे ती थेट छतावरुन खाली पडली. तेही तिच्या वडिलांसमोर.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता की, एक माणूस घरातून बाहेर येत आहे. याच वेळी एक चिमुकली वरुन खाली जमिनीवर जोरात आदळते. यामुळे तो माणूस दचकतो. पटकन मुलीला उचलतो आणि तिच्या पाठीवरुन हात फिरवत तिला शांत करायला लागतो. चिमुकली खूप रडत असते. याच वेळी आसपासचे शेजारी लोक येतात. वरती घराच्या छताकडे बघून काही तरही चर्चा करत असतात. या व्हिडिओच्या कॅप्शननुसार, चिमुकलीवर माकडाने हल्ला(attack) केला होता. पण व्हिडिओत माकडे दिसली नाहीत. यामुळे चिमुकली पडण्यामागचे नेमकं कारण अस्पष्ट आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @pixelsabhi या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी चिमुकलीला तातडीने डॉक्टरांकडे घेऊन जाऊन आवश्यक ती तपासणी, उपचार करण्याचा सल्ला दिला आहे. अनेकांचा या घटनेने थरकाप उडाला आहे. लोकांनी चिमुकली वर गेली कशी आणि कोणासोबत होती असे प्रश्न केले आहेत. सध्या या घटनेने उत्तर प्रदेश हादरला आहे.

हेही वाचा :

UPI ट्रान्झॅक्शन करणं झालं आणखी सोपं, पेमेंटसाठी पिनची गरज नाही..
‘तिचं घर माझ्यामुळे चालतंय म्हणून…’; धनश्रीच्या आरोपांवर अखेर युजवेंद्र चहल
‘प्रायव्हेट व्हिडीओ बनवले, धमक्या दिल्या….सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या….