UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता पेमेंट(payment) करताना तुम्हाला पिन नंबर टाकण्याची गरज नाही. कारण आता युजर्स फेसआईडी किंवा फिंगरप्रिंटने पेमेंट करू शकणार आहेत. नेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने UPI साठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन लाँच केले आहे. त्यामुळे आता ऑनलाईन पेमेंट अधिक सुरक्षित आणि वेगवान होण्याची शक्यता आहे.असं सांगितलं जात आहे की, नेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने लाँच केलेले बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन पिन नंबरपेक्षा वेगवान, सुरक्षित आणि यूजर-फ्रेंडली पर्याय मानला जाणार आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनची संपूर्ण प्रक्रिया ऑन डिव्हाईस असणार आहे आणि आता ही प्रोसेस पिन नंबरची जागा घेणार आहे. UPI पेमेंट प्लॅटफॉर्म 2016 मध्ये लाँच करण्यात आले होते आणि तेव्हापासून ऑनलाईन पेमेंटसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे.

UPI पेमेंटसाठी (payment)बायोमेट्रिक्स सिस्टम लाँच केल्यामुळे आता युजर्सना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या नवीन सिस्टममुळे सीनियर सिटीजन आणि नवीन युजर्सना पेमेंट करताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. NPCI ने सांगितलं आहे की, आतापर्यंत UPI पिन क्रिएट करण्यासाठी डेबिट कार्ड डिटेल्स आणि आधार OTP वेरिफिकेशनची गरज होती. मात्र आता आधार-बेस्ड फेस ऑथेंटिकेशननंतर याचा वापर करणं आधिक सोप आणि वेगवान होणार आहे.
ज्यांच्याकडे डेबिट कार्ड नाही त्यांच्यासाठी देखील हे सोयीचे ठरणार आहे. ही सिस्टम फसवणूक रोखण्यास देखील मदत करेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अलिकडच्या काळात पिन नंबरशी संबंधित अनेक घोटाळे नोंदवले गेले आहेत आणि आरबीआयने याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता ही नवीन सिस्टम कशी फायदेशीर ठरणार आणि घोटाळे रोखण्यासाठी कशी मदत करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

यूजर्स फेसआईडी आणि फिंगरप्रिंटच्या मदतीने UPI पिन सेट करू शकतात. याशिवाय ATM मधून UPI द्वारे पैसे काढताना देखील बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनचा वापर केला जाऊ शकतो. याशिवाय यूजर्सना ऑप्ट-इन करावं लागणार आहे. म्हणजे यूजर त्याच्या इच्छेनुसार पिन किंवा फेसआयडी इत्यादी वापरू शकेल. या फीचरवर बऱ्याच काळापासून काम सुरु होतं.

हे नवीन फीचर स्मार्टफोनच्या इनबिल्ट सिक्योरिटी सिस्टमचा वापर करू शकते. म्हणजेच जर तुमच्या फोनमध्ये आधीपासूनच फिंगरप्रिंट किंवा फेस रिकग्निशनची सुविधा दिली जात असेल, तर तुम्ही UPI पेमेंटसाठी देखील याचा वापर केला जाणार आहे.प्रथम, तुम्हाला UPI अॅपमधील बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन पर्याय निवडावा लागेल.आता, जेव्हा तुम्ही पेमेंट करता तेव्हा अॅप तुम्हाला तुमच्या फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशन वापरून व्यवहाराची पुष्टी करण्याचा पर्याय देखील दाखवेल.यासह, प्रत्येक पेमेंट बँकेकडून क्रिप्टोग्राफिकली व्हेरिफाय केले जाईल, जेणेकरून सुरक्षितता राखली जाईल.
हेही वाचा :
भारतीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेकडून मोठा छळ….
अजित पवारांनी छगन भुजबळांना झापलं…बैठकीत नेमकं काय घडलं?
डी के एस सी मध्ये अभिजात मराठी भाषा दिवस संपन्न…