सध्या देशात अनेकजण यूपीआय पेमेंट्सचा वापर करतात. डिजिटल पेमेंटमुळे अनेक गोष्टी अधिक सोप्या झाल्या आहेत. तुम्ही एका क्लिकवर कोणालाही पैसे पाठवू शकतात. दरम्यान, आता यूपीआयच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. उद्यापासून हे नवीन नियम लागू होणार आहे.यूपीआय म्हणजे यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेसवरुन ट्रान्झॅक्शन करणाऱ्या युजर्संना आता PIN टाकण्याची गरज नाही.पिन टाकण्याऐवजी तुम्ही फेस आयडेंटिफिकेशन किंवा फिंगरप्रिंटच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन करु शकणार आहात. उद्यापासून म्हणजेच ८ ऑक्टोबरपासून ही सुविधा सुरु होणार आहे.

NPCI हे फीचर ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये लाँच करणार आहे. यामुळे डिजिटल पेमेंट्स अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, हे नवीन फीचर आधार सिस्टीममध्ये असलेल्या बायोमॅट्रिक डेटाद्वारे पेमेंट प्रमाणित करेल. याचाच अर्थ असा की युजर्सचा चेहरा किंवा फिंगरप्रिंट हा आधार डेटाशी जुळणार आहे. यामुळे पेमेंट अधिक सोयीस्कर होणार आहे.

डिजिटल व्यव्हारांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. यामध्ये या नवीन फीचरमुळे डिजिटल पेमेंटमझ्ये सुरक्षितता आणि युजर्सचा अनुभव दोन्ही सुधारण्याची अपेक्षा आहे. सध्या युजर्संना प्रत्येक व्यव्हारांसाठी ४ किंवा ६ अंकी पिन टाकावा लागत आहे. आता हे नवीन फीचर लागू झाल्यानंतर फेस स्कॅन आणि फिंगरप्रिंट सेन्सर वापरुन पेमेंट करता येणार आहे. यामुळे ट्रान्झॅक्शनचा कालावधी कमी होणार आहे याचसोबत सुरक्षितता वाढणार आहे.

हेही वाचा :

जगात खळबळ! भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा, 3D चा वापर करून शस्त्रे…

कोल्हापूर गरीब असल्याचा फायदा घेऊन वेश्‍या व्यवसाय चालवायचा, लॉजवर पोलिसचं ग्राहक बनून गेले अन्…

आनंदाची बातमी! MPSC कडून ‘गट क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात