लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या प्लॅटफॉर्मला आधुनिक (update)करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचलत आहे.नवीन Android बीटामध्ये युजरनेम रिझर्वेशन फीचरची चाचणी सुरू करण्यात आली आहे. या बदलामुळे लवकरच युजर्स मोबाईल नंबर न देता फक्त युजरनेमच्या आधारे संपर्क साधू शकतील, जसे की टेलिग्राममध्ये आधीपासूनच सुविधा आहे.2009 पासून व्हॉट्सअॅपवर नोंदणी आणि संपर्कासाठी मोबाईल नंबर आवश्यक होता. मात्र आता युजरनेम प्रणालीमुळे युजर्सना त्यांच्या प्रोफाईलमध्ये आधी पेक्षा जास्त प्रायव्हसी मिळणार आहे. या फीचरच्या सध्याच्या बीटा चाचणीत युजर्सना आपल्या पसंतीचे युजरनेम आधीपासूनच रिझर्व्ह करण्याची संधी दिली जाणार आहे. यामुळे लोकप्रिय नावांची नोंदणी योग्य प्रकारे होईल आणि फीचरचा टप्प्याटप्प्याने बदल करताना कंपनीला सिस्टिमची क्षमता तपासता येईल.

युजरनेमसाठी काही नियमदेखील निश्चित करण्यात आले आहेत.(update) वापरकर्त्यांचा युजरनेम www.ने सुरू होता कामा नये, तसेच त्यात किमान एक अक्षर असणं आवश्यक आहे. फक्त अंक किंवा चिन्हे असलेले नाव मान्य होणार नाही. तसेच युजरनेममध्ये केवळ इंग्रजी अक्षरे (a to z), अंक (0–9), डॉट (.) आणि अंडरस्कोर (_) यांचा वापर करता येईल.

सध्या हे फीचर केवळ रिझर्वेशनसाठी उपलब्ध असला तरी, (update)भविष्यात वापरकर्ते आपल्या युजरनेमच्या माध्यमातून थेट चॅट आणि कनेक्शन करू शकतील. व्हॉट्सअॅपने या फीचरच्या अधिकृत लॉंचची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, बीटा आवृत्तीत त्याची उपस्थिती पाहता हा मोठा बदल लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
दुर्लक्ष न करता घ्या काळजी….
Renault Triber ची चावी तुमच्या हातात,
आजची आश्विन पौर्णिमा राशींसाठी भाग्याची! लक्ष्मी-गणेशाची मोठी कृपा,