इन्स्टाग्राम हे खूप प्रसिद्ध सोशल मिडिया अॅप आहे. इन्स्टाग्रामवर लाखो युजर्स आहेत.(Instagram) दरम्यान, इन्स्टाग्राम अनेक जाहिरातीदेखील येतात. अनेकदा आपण जे बोलतो किंवा जो विचार करतो त्याच जाहिराती आपल्याला दिसतात. त्यामुळे अनेकदा प्रश्न पडतो की, इन्स्टाग्रामला आपलं बोलणं कसं समजतं किंवा आपल्या मनात ज्या वस्तूंबाबत आपण विचार करतो त्याच्याच जाहिराती कशा येतात? यामुळे इन्स्टाग्रामच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले होते.

इन्स्टाग्राम तुमचे बोलणे ऐकतो किंवा तुमच्या वैयक्तिक माहितीवरुन तुम्हाला जाहिराती दाखवतो, असं अनेकजण म्हणतात. जर असं असेल तर तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो. (Instagram)दरम्यान, आता याबाबत स्वतः इन्स्टाग्रामचे प्रमुखांनी माहिती दिली आहे.इन्स्टाग्राम प्रमुखांनी सांगितलंय की, आम्ही युजर्संना खात्री देतो की अॅप किंवा फोनच्या मायक्रोफोनच्या माध्यमातून आम्ही तुमचे बोलणे ऐकत नाही. त्यामुळे इन्स्टाग्रामबाबत कोणतीही चिंता बाळगण्याची गरज नाही.

इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी यांनी सांगितले की, आम्ही तुमचे कोणत्याही प्रकारचे बोलणे ऐकत नाही. तुमचं बोलणं ऐकण्यासाठी मायक्रोफोनचा वापर करत नाही.(Instagram)जर इन्स्टाग्राम खरंच तुमचे चॅट्स रेकॉर्ड करत असेल तर ते तुमच्या सहज लक्षात येईल.मोसेरी यांनी सांगितले की, मेटा सारख्या कंपन्या बिझनेस मॉडेल फॉलो करते. जे तुमच्या वेबवर तुमच्या आवडीच्या गोष्टींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करते.त्यासाठी जाहिरातीच्या कंपनीसोबत काम करते. ज्यामध्ये वेबसाइटवर आणि फीडवर तुम्हाला जे आवडेल ते दाखवण्याचा प्रयत्न करते.

हेही वाचा :

आजपासून कागदी बाँड हद्दपार तर नव्या E-Bondची एंट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय

महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक टॉयलेट्स नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी खुले करा उमाकांत दाभोळे .

राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडांना अटक; एटीएसच्या कारवाईने एकच खळबळ…