भारतामध्ये आधार कार्ड (Aadhaar card)हा रहिवासी ओळखपत्राचा प्रमुख आधारस्तंभ आहे. मुलांच्या जन्मापासून ते शिक्षण, सरकारी नोंदी, पॅन कार्ड, रेशन कार्ड अशा अनेक कामांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. तसेच, दर १० वर्षांनी आधार कार्ड अपडेट करणेही अनिवार्य आहे. घर बदलणे, लग्नानंतर नाव बदलणे, ईमेल किंवा जन्मतारीख बदलणे यासह इतर माहिती अद्ययावत करण्यासाठीही आधार अपडेट आवश्यक ठरतो.

यंदा सरकारने या प्रक्रियेला आणखी सोपी आणि जलद करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. UIDAI नोव्हेंबरपासून आधार कार्ड अपडेटसाठी डिजिटल प्रक्रिया सुलभ करणार आहे. यामुळे पेपरवर्क कमी होईल, ऑथेंटिकेशन जलद होईल आणि कागदपत्रे अपलोड करण्याची गरज कमी होईल. पत्ता बदलण्यासाठी आता लाइट बिल सुद्धा पुरावा म्हणून स्वीकारले जातील, ज्यामुळे प्रक्रिया सिंपल आणि सोपी होणार आहे.
UIDAI लवकरच मोबाईल अॅप लाँच करण्याची तयारी करत आहे. या अॅपमध्ये QR कोडद्वारे डिजिटल आधार माहिती उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे ऑफलाइन फोटोकॉपीची आवश्यकता नाही. नागरिक आता डिजिटल आधार कार्ड किंवा मास्क केलेली कॉपी सहज शेअर करू शकतील, ज्यामुळे फ्रॉडचा धोका कमी होईल.

तसेच, जर नागरिकांना पत्ता बदलायचा असेल तर ते myAadhaar अॅपवर जाऊन मोफत बदलू शकतात. ही सुविधा १४ जूनपर्यंत उपलब्ध राहणार आहे. या प्रक्रियेसाठी आधार कार्ड (Aadhaar card)आणि मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे. या नवीन सुधारित प्रक्रियेमुळे नागरिकांसाठी आधार अपडेट करणे अधिक सोपे, जलद आणि सुरक्षित होईल.
हेही वाचा :
प्रेमानंद महाराजांचे नाव घेत टाकलं जाळं, महिलेवर पाशवी बलात्कार…
काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरे यांचीच इच्छा… संजय राऊत यांचं…
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात शाहरुख – काजोलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल…