उत्तर प्रदेशातील मथुरा आणि वृंदावन(Vrindavan) हे धार्मिक स्थळे असून येथे श्रद्धेच्या नावाखाली धक्कादायक घटना समोर आली आहे. वृंदावनमधील राधा निवास येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आग्रा येथील एका महिलेला आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांच्याशी वैयक्तिक भेट घडवून देण्याचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेनं या घटनेची तक्रार पोलिसांना दिल्यानंतर आरोपी सुंदरम राजपूत याला अटक करण्यात आली आणि न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस अधिकारी संजय पांडे यांच्या माहितीनुसार, ही घटना 12 सप्टेंबर रोजी घडली. पीडित महिला प्रेमानंद महाराज यांची अनुयायी असून आरोपीशी सुरुवातीला सोशल मीडियावर मैत्री झाली होती. सुंदरमने महिलेला सांगितले की, तो महाराजांच्या भक्तांपैकी एक असून वैयक्तिक भेट घडवू शकतो. 10 ऑगस्टला आरोपीने मेसेज पाठवून दर्शनाची व्यवस्था करणार असल्याची माहिती दिली, आणि 12 सप्टेंबर रोजी महिला आपल्या भावासोबत वृंदावनला पोहोचली.

आरोपीने महिलेला मोटारसायकलवर बसवून आश्रमाऐवजी राधाकृष्ण धाम हॉटेलमध्ये नेले. तिथे कॉफीमध्ये ड्रग्ज मिसळून पीडित महिला बेशुद्ध केली. त्यानंतर आरोपीने बलात्कार केला(Vrindavan) आणि तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले. तसेच हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेला ब्लॅकमेल केले. आरोपीवर अनेक वेळा बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांना मिळाली.पोलीसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, सुंदरम राजपूतला देवराहा बाबा घाट रोडवरून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करून कोठडीत पाठवण्यात आले. पोलिस सध्या डिजिटल पुरावे गोळा करण्यास, तसेच व्हिडिओ आणि चॅट रेकॉर्डिंग जप्त करण्यास काम करत आहेत.

हेही वाचा :

काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरे यांचीच इच्छा… संजय राऊत यांचं…
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात शाहरुख – काजोलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल…
पुन्हा अस्मानी संकट, 15 ऑक्टोबरला काय होणार ?