बॉलिवूडची अजरामर जोडी, शाहरुख खान आणि काजोलयांनी पुन्हा एकदा फिल्मफेअरच्या मंचावर आपल्या नृत्याने चाहत्यांची मने जिंकली. शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या ७० व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या जोडीने आपल्या अविस्मरणीय गाण्यांवर एक जबरदस्त परफॉर्मन्स दिला, ज्याचा व्हिडिओ (video)सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

शाहरुख आणि काजोलने आपल्या सदाबहार केमिस्ट्रीची जादू पुन्हा एकदा दाखवून दिली. त्यांनी ‘सूरज हुआ मद्दम’ आणि ‘ये लडका है दीवाना’ यांसारख्या आयकॉनिक गाण्यांवर अप्रतिम नृत्य सादर केले. याशिवाय ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘कुछ कुछ होता है’ या त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमधील गाण्यांवर थिरकून त्यांनी उपस्थितांच्या आणि चाहत्यांच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या.

यावेळी दोघांनीही काळ्या रंगाचे पोशाख परिधान केले होते; शाहरुखने काळ्या रंगाचा सूट घातला होता, तर काजोल काळ्या साडीत अतिशय आकर्षक दिसत होती. फिल्मफेअरच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर होताच तो वेगाने व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी त्यांच्या केमिस्ट्रीचे तोंडभरून कौतुक केले आहे.

विशेष म्हणजे, तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाहरुख खानने या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. त्याला करण जोहर, अक्षय कुमार आणि मनीष पॉल यांनी साथ दिली. या कार्यक्रमात शाहरुखला भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

शाहरुख आणि काजोल ही ९० च्या दशकातील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडी मानली जाते. त्यांनी १९९३ साली ‘बाजीगर’ पासून एकत्र काम करण्यास सुरुवात केली आणि (video)त्यानंतर ‘करण अर्जुन’, ‘डीडीएलजे’, ‘कभी खुशी कभी गम’ ते २०१६ मधील ‘दिलवाले’ पर्यंत अनेक यशस्वी चित्रपट दिले. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री इतकी प्रभावी होती की, अनेकजण त्यांना खऱ्या आयुष्यातही जोडीदार समजत होते, मात्र ते दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.

हेही वाचा :

पुन्हा अस्मानी संकट, 15 ऑक्टोबरला काय होणार ?
खरेदीदारांना दिलासा!
 ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘केजीएफ २’ चा रेकॉर्ड मोडणार?