बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल आजही चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दोघांनी एकत्र अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं (relationship)असून, त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घातली. मात्र, त्यांच्या खासगी नात्याच्या चर्चा त्या काळात फक्त बॉलिवूडपुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत, तर देशभर चर्चेचा विषय ठरल्या. अनेक वर्षांनंतरही रेखा आणि अमिताभ यांचं नाव घेतलं की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.

एका मुलाखतीत जेव्हा रेखा यांना विचारण्यात आलं की “अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना तुम्हाला त्यांच्यावर प्रेम झालं का?” यावर रेखा यांनी थेट उत्तर देत म्हटलं, “हा कसला मूर्ख प्रश्न आहे! मी अशी कोणतीही व्यक्ती पाहिली नाही जी अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करत नाही. प्रत्येक जण बिग बींवर प्रेम करतो, मग मीच का नाही?” त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “मी कधीच असं म्हणणार नाही की मी त्यांच्यावर प्रेम करत नाही.”
यासिर उस्मान यांच्या रेखा यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकातही रेखा यांच्या या भावनांचा उल्लेख करण्यात आला आहे, जिथे त्या म्हणतात — “जगभरातील सगळं प्रेम एकत्र करा, आणि त्यात अजून थोडं जोडा… इतकं प्रेम मी अमिताभ यांच्यावर करते.” मात्र, नंतर एका दुसऱ्या मुलाखतीत रेखा यांनी स्पष्ट केलं की त्यांच्या आणि अमिताभ बच्चन यांच्यात कोणतेही खासगी संबंध नव्हते. त्या म्हणाल्या, “आमचं नातं केवळ अफवांपुरतं होतं. मी त्यांच्यावर एक चाहती म्हणून प्रेम केलं, प्रेमिका म्हणून नाही.”

रेखा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनयाची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर (relationship)कायम आहे. तथापि, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक चढउतार आले. त्यांनी एका उद्योगपतीसोबत लग्न केलं होतं, पण केवळ सहा महिन्यांनंतर त्यांच्या पतीने आत्महत्या केली. त्यानंतर रेखा यांनी एकट्याने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. आज त्या ग्लॅमरपासून दूर असूनही, त्यांचं नाव घेतलं की बॉलिवूडमधील एक दैदिप्यमान अध्याय नजरेसमोर उभा राहतो.
हेही वाचा :
पाक / अफगाण सीमेवर युद्धसदृश्य ताण तणाव…
सोनं-चांदी पुन्हा चमकलं! दरवाढीने बाजारात खळबळ…
पेन्शनधारकांना दिवाळी गिफ्ट; पेन्शन कमीत कमी 1000 रुपयांनी वाढणार…