कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:

नियतीच्या मनात नेमके काय असते याचा थांगपत्ता कोणासही लागत नाही. कालचा शत्रू आजचा मित्र आणि आजचा मित्र उद्याचा शत्रू असं घडत असत ते नियतीच्या मनाप्रमाणे! तालिबानी दहशतवादी संघटनेने भारताच्या तुरुंगात असलेल्या पाकिस्तानी असद मसूर सह काही दहशतवाद्यांच्या मुक्ततेसाठी कंधार विमानतळावर(border) भारताचे विमान हायजॅक केले होते. आता याच तालिबानी संघटनेची अफगाणमध्ये सत्ता आहे आणि याच सरकारचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मतक्की सध्या भारताच्या दौऱ्यावर असून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये द्विपक्ष संबंध प्रस्थापित झालेले आहेत. आणि अफगाणिस्तानचे पाकिस्तानशी संबंध पूर्णपणे बिघडलेले आहेत.


भारताने अफगाणिस्तान मधील तालिबानी सरकारला मान्यता दिलेली नसली तरी अफगाणचे नवी दिल्ली येथे कार्यरत आहे आणि आता भारत सुद्धा अफगाणिस्तानात आपले राजदूत कार्यालय सुरू करणार आहे. या दोन राष्ट्रांमध्ये द्विपक्ष संबंध प्रस्थापित होत आहेत आणि परराष्ट्रमंत्री आमिर खान मतक्की हे भारताच्या(border) दौऱ्यावर आहेत हे पाकिस्तानला रुचलेले नाही.त्यांचा मुक्काम दिनांक 16 ऑक्टोबर पर्यंत आहे, आणि या पार्श्वभूमीवर या दोन देशांच्या सीमेवर भडका उडाला आहे. हा भडका उद्या किंवा नजीकच्या काळात युद्धात रूपांतरित झाला तर पश्चिम आशियाई भागातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे.

इजराइल आणि पॅलेस्टेनी यांच्यात युद्धबंदी होऊन गाझा मध्ये शांतता प्रस्थापित होऊन तेथील नागरिक गाझामध्येपरतायला सुरुवात झाली असतानाच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.पाकिस्तानने काबुलवर काही क्षेपणास्त्र डागल्यानंतर अफगाणच्या सुरक्षा दलाने पाकिस्तानी चौक्या वर हल्ले करून त्या ताब्यात घेतल्या. 30 पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. पाकिस्तानच्या तुलनेत अफगाण ची संरक्षण व्यवस्था फारच कमी आहे. पण तरीही त्यांनी पाकिस्तानमध्ये खळबळ उडावी इतका प्रभावी हल्ला केला आहे.काही दिवसांपूर्वी पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात मैत्री करार झाला असून दोन्हीपैकी कोणत्याही एका राष्ट्रावर हल्ला झाल्यास तो दोन्ही राष्ट्रांवर हल्ला झाला आहे असे समजून प्रतिकार केला जाईल असे त्यांच्या संरक्षण विषयक करारात म्हटले आहे.


आता अफगाणिस्तानने पाकिस्तानवर हल्ला केल्यामुळे सौदी अरेबिया काय करणार? संरक्षण कराराप्रमाणे तो पाकिस्तानच्या मदतीला धावून येणार का किंवा अफगांणवर हल्ला करणार का? असा सवाल पुढे आला आहे. आत्तापर्यंत तरी सौदी अरेबियाने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही.पाकिस्तान अंतर्गत अराजक सदृश्य परिस्थितीमुळे, यादवीमुळे अडचणीत आला आहे. मेटाकुटीला आला आहे. प्रचंड महागाईमुळे तेथील जनता जगण्याची लढाई लढत आहे. पख्तून बलुचिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर या तिन्ही प्रांतातून शहाबाद शरीफ सरकार विरुद्ध असंतोष उफाळून आला आहे. बलुचिस्तानने तर स्वतंत्र राष्ट्र म्हणून स्वतःला घोषित करून टाकले आहे. पाक व्याप्त काश्मीर मधील अवामी ॲक्शन कमिटीने पाकिस्तान सरकारकडे 38 मागण्या केल्या आहेत. आणि त्याही मान्य केल्या जात नाहीत.

तेथे सध्या गव्हाचा दर प्रति किलो 350 रुपये आहे आणि भारतातील काश्मीरमध्ये म्हणजे पाक व्यक्त काश्मीर पासून अवघ्या काही किलोमीटरवर अंतरावर गहू फक्त 40 रुपये प्रति किलो दराने मिळतो आहे. महागाईचा किती भडका उडाला आहे त्याच्यासाठी हे एक उदाहरण पुरेसे आहे.पाकिस्तानी लष्कराला तेथील पोलीस दलाला तीन ठिकाणी गुंतून पडावे लागले आहे. हे तिन्ही प्रांत केव्हाही पाकिस्तान पासून वेगळे होतील अशी स्फोटक स्थिती तेथे आहे. अशावेळी अफगाण बरोबर संघर्ष भडकला आहे. एकाच वेळी पाकिस्तान लष्कराला चार ठिकाणी आघाड्या उघडाव्या लागत आहेत.अफगाण बरोबर झालेल्या द्विपक्षीय चर्चेत भारताने संरक्षण विषयक मदत देण्याचे मान्य केले आहे.

तेथील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचे मान्य केले आहे.याचा अर्थ अफगाणला सर्व प्रकारची सुरक्षा भारताकडून दिली जाणार आहे. या बदल्यात अफगाण मधील सर्व प्रकारची खनिजे भारतासाठी उपलब्ध होणार आहेत. याआधी चीनने तेथे मोठी गुंतवणूक केलेली आहे आणि आता भारतही तेथे गुंतवणूक करणार असल्यामुळे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना पोटात दुखू लागले आहे. एकेकाळी आपल्या तालावर नाचणारे तालिबानी हे आता आपल्यावर उलटले आहेत आणि आपला पारंपारिक शत्रू असलेल्या भारताबरोबर संबंध प्रस्थापित करतो आहे याबद्दल शहाबाज शरीफ, फिल्डमार्शल असीम मुनिर यांचा जळफळाट सुरू आहे.या एकूण पार्श्वभूमीवर पाकिस्तान मध्ये सिव्हिल वॉर होण्याची शक्यता आहे. तेथील पाक जनतेला फिल्ड मार्शल नको आहेत. नजीकच्या काळात पाकिस्तान मध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा :

सोनं-चांदी पुन्हा चमकलं! दरवाढीने बाजारात खळबळ…
पेन्शनधारकांना दिवाळी गिफ्ट; पेन्शन कमीत कमी 1000 रुपयांनी वाढणार…
पुन्हा संकट..शेतकऱ्यांच्या पोटात गोळा,पाऊस पुन्हा झोडपणार हवामान खात्याचा इशारा