दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला असून राज्यभरात तयारीचा जोर चांगलाच वाढला आहे. घराघरांत साफसफाई, सजावट, खरेदी आणि फराळ बनवण्याची लगबग सुरू झाली आहे. परंतु, यंदाच्या दिवाळीत गार वाऱ्यांऐवजी पावसाच्या सरींची (Farmers)चाहूल लागली आहे. हवामान विभागाने 15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे यंदा दिवाळीचा आनंद फटाक्यांच्या आवाजासोबत विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यांमध्ये अनुभवता येईल, असे चित्र दिसत आहे.

मे महिन्यापासून कोसळत असलेला पाऊस अजूनही पूर्णपणे थांबलेला नाही. गणपती, नवरात्रोत्सव आणि दसरा यांसारख्या सणांमध्ये हजेरी लावणारा पाऊस आता दिवाळीतही पाठ सोडणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 15 ते 18 ऑक्टोबरदरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागांत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. या काळात वसुबारस (17 ऑक्टोबर), धनत्रयोदशी (18 ऑक्टोबर) आणि नरक चतुर्दशी (20 ऑक्टोबर) हे दिवाळीचे प्रमुख दिवस येत असल्याने अनेकांच्या सणासुदीच्या तयारीवर पावसाचा परिणाम होऊ शकतो.
मान्सूनने जरी महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून परतीची वाट धरली असली, तरी पूर्व विदर्भातील गडचिरोलीच्या काही भागांत अजूनही मान्सूनचा प्रभाव कायम आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत तो पूर्णपणे परत जाईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र, त्यानंतरही राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता कायम आहे.

मुंबईसह किनारपट्टी भागांमध्ये 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिवाळीत ओलसर वातावरणाचा अनुभव येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांमध्येही(Farmers) यामुळे चिंतेचे वातावरण आहे, कारण पावसामुळे उभ्या पिकांवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने सर्व जिल्ह्यांना याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा :
लाडकी बहीण योजनेतून ६० लाख महिलांना वगळणार….
विवाहितेवर वारंवार लैंगिक अत्याचार, अश्लील व्हिडीओ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नेता फरार..
ठाकरे बंधू एकत्र येण्याआधीच वितुष्ट? संजय राऊत यांच्या वक्तव्याने….