राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा निशाणा साधत ‘लाडकी बहीण’ योजनेतील बदलांविरोधात पत्रकार परिषदेत ताजा आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेतून सध्या २८ लाख महिलांची (women)नावे कमी करण्यात आली आहेत आणि पुढील अटी लावून ५० ते ६० लाख महिलांची नावे काढली जाऊ शकतात.

रोहित पवार म्हणाले, “मतदान मिळवण्यासाठी महायुती सरकारने या योजना सुरु केल्या होत्या. लाडकी बहीण योजनेसोबतच धार्मिक पर्यटनाची योजना, शिक्षणासाठी आणलेल्या काही योजना आणि आनंदाचा शिधाही बंद करण्यात आला. निवडणुकांनंतर लोकांचा वापर करून आता या योजना विसरल्या गेल्या आहेत.”

त्यांनी पुढे म्हटले, “लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासूनच आम्ही सांगत होतो की २४ ते २५ लाख महिलांची नावे कमी केली जाऊ शकतात, मात्र मंत्री यावेळी म्हणाले, ‘कोणाच्याही नावावर परिणाम होणार नाही.’ आता मात्र तब्बल २८ लाख नावे योजनेतून काढण्यात आली आहेत.”

रोहित पवारांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा संदर्भ देत सरकारवर टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, “सरकार स्वतः योजना बंद करेल किंवा कोर्टाच्या माध्यमातून बंद करायला भाग पाडेल. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, लोकांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारकडे (women)पैसा नाही, पण कॉन्ट्रॅक्टरसाठी २५ ते ३० हजार कोटींची रक्कम सहज उपलब्ध आहे.”या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वादळ निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

ठाकरे बंधू एकत्र येण्याआधीच वितुष्ट? संजय राऊत यांच्या वक्तव्याने….
जग हादरलं! सगळ्या शाळा बंद, थेट महामारीची घोषणा….
शेतकर्‍यांसाठी सरकारची आणखी एक योजना; ३० हजार रुपयांची मदत देणार..