करोना महामारीनंतर जग आता पुन्हा एका नव्या आरोग्यसंकटास सामोरे जात आहे. जपानने इन्फ्लूएंझा (फ्लू) महामारी जाहीर केली असून देशभरात फ्लूच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. आरोग्य(health) मंत्रालयाच्या माहितीनुसार, ४,००० हून अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत, तर अनेक शाळा व बालसंगोपन केंद्रे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत.तज्ज्ञांच्या मते, या वर्षी फ्लूचा प्रकोप नेहमीपेक्षा पाच आठवडे आधी सुरू झाला आहे, ज्यामुळे आशियात विषाणूच्या प्रसाराच्या पद्धतीत बदल झाल्याचे दिसत आहे. टोक्यो, ओकिनावा आणि कागोशिमा येथे रुग्णसंख्या सर्वाधिक आढळत आहे.

डॉक्टर सांगतात की, हा फ्लू H3N2 स्ट्रेनमुळे होत असून, तो यापूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. कोविडनंतर कमी झालेलं लसीकरण, हवामानातील अनियमितता आणि रोगप्रतिकारक शक्तीतील (health)अस्थिरता ही वाढत्या रुग्णसंख्येची प्रमुख कारणं आहेत.आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना त्वरित लसीकरण करण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. डॉक्टरांनी इशारा दिला आहे की, जर फ्लूचा प्रसार अशाच गतीने झाला, तर आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येऊ शकतो.

जागतिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ही परिस्थिती भारतासह इतर आशियाई देशांसाठी धोक्याची घंटा आहे, कारण हिवाळ्याचा हंगाम जवळ येत असून या काळात श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता असते.
हेही वाचा :
शाळेच्या दिवाळी अन् उन्हाळी सुट्ट्या जाहीर….
भारतातील ‘या’ लोकांना नाही मतदानाचा हक्क, कारण घ्या जाणून…
फक्त रोहित शर्मा अन् विराट कोहली नव्हे, 5 खेळाडूंवर टांगती तलवार….