भंडारा जिल्ह्यातील बस स्थानकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिला कंडाक्टरची दादागिरी दिसून येत आहे. सुट्ट्या पैशांसाठी महिला कंडाक्टरने(conductor) प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी बस स्थानकावर घडली आहे. महिला कंडाक्टरने त्या प्रवाशाला लाथा बुक्क्याने जोरदार हाणामारी केली आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेबाबत प्रवाशांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार प्रवाशी मध्यप्रदेशातील आहे. प्रवाशाकडे सुट्टे पैसे नसल्याने महिला कंडक्टरने(conductor) मारहाण केली, माहिती घटनास्थळावरील इतर प्रवाशांनी दिली आहे. त्या महिला कंडाक्टरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या घटनेनंतर जोर धरत आहे.
भंडारा जिल्ह्यातील महिला कंडक्टरकडून मारहाणीची ही पहिलीच घटना नाही. आठ दिवस आधी एका महिला कंडक्टरने विद्यार्थिनीला केस ओढून मारहाण केल्याची घटना समोर आली होती. शालेय विद्यार्थिनींना एसटी महामंडळाच्या बसनं प्रवास करण्याकरिता मोफत पास देण्यात येतो. मात्र, याची मुदत संपल्यानंतर प्रवास करणाऱ्या एका विद्यार्थिनीला महिला बस वाहकानं पासबाबत विचारल्यानंतर धावत्या बसमध्येचं वाहक आणि विद्यार्थिनींमध्ये वाद झाला.

दरम्यान, हा वाद विकोपाला गेल्यानं विद्यार्थिनींनं वाहकाच्या हातातील तिकीट कापण्याची मशीन पळविण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा वाद अजून चिघळला. तर, तिला पकडण्यासाठी महिला वाहकानं विद्यार्थिनीच्या डोक्याचे केस पकडून तिला पकडून ठेवलं. या वादात विद्यार्थिनीच्या डोक्याची प्रचंड वेदना झाल्यानं ती ओक्साबोक्षी रडायला लागली. हा संपूर्ण प्रकार भंडाऱ्याच्या सूरेवाडा बस स्थानकावर घडला. यात ग्रामस्थांनी त्यांच्या मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडीओ बनवल्यानंतर तो सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल झाला.दरम्यान या दोन घटनेमुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. मारहाण करणाऱ्या महिला कंडक्टरवर तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा :
प्रेमानंद महाराजांचे नाव घेत टाकलं जाळं, महिलेवर पाशवी बलात्कार…
काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरे यांचीच इच्छा… संजय राऊत यांचं…
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात शाहरुख – काजोलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल…