महाराष्ट्रातील राजकीय(political) वातावरणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या अलीकडच्या भेटींनंतर ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची चर्चा जोरात आहे. 5 जुलैच्या मेळाव्यानंतर दोघांचे अनेकदा एकत्र येणं — कधी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात, तर कधी एकमेकांच्या निवासस्थानी भेट देणं — यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. जरी दोन्ही पक्षांनी अद्याप औपचारिक घोषणा केलेली नसली, तरी दोन्ही नेत्यांच्या वारंवार भेटी आणि पक्षपातळीवरील हालचालींमुळे आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मनसे-शिवसेना युती होण्याची शक्यता बळावली आहे.

दरम्यान, या चर्चेला आणखी एक नवीन वळण लागलं आहे. आता ही युती फक्त शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेपुरती मर्यादित न राहता, महाविकास आघाडीसह (मविआ) म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यासोबत मनसेलाही जोडण्याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भाष्य करत या शक्यतेला बळ दिलं आहे.

संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे — महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक पक्षाचं आपलं स्थान आहे. शिवसेना (ठाकरे गट), मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), डावे पक्ष आणि काँग्रेस हे सर्व राज्याच्या राजकीय समीकरणातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे जर कोणतेही निर्णय घ्यायचे असतील, तर शिष्टमंडळात काँग्रेसचाही समावेश असणं आवश्यक आहे. ही भूमिका केवळ आमची नाही, ती राज ठाकरे यांचीही आहे.”

तथापि, राऊत यांनी हेही स्पष्ट केलं की अद्याप या विषयावर कोणताही औपचारिक निर्णय झालेला नाही. त्यांनी सूचकपणे म्हटलं की, “काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीत आहे. त्यामुळे अंतिम निर्णय(political) दिल्लीतील नेतृत्वच घेईल.”राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीसोबतच, जर मनसे महाविकास आघाडीत सामील झाली, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे समीकरण राज्यातील सत्तासंतुलनात निर्णायक ठरू शकतं.

हेही वाचा :

पुन्हा अस्मानी संकट, 15 ऑक्टोबरला काय होणार ?
खरेदीदारांना दिलासा!
 ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘केजीएफ २’ चा रेकॉर्ड मोडणार?