नाशिक पोलिसांनी राज्यातील राजकीय गुंडांवर कडक कारवाई करण्याचा विडा उचलला आहे. अलिकडच्या काळात नाशिक पोलिसांनी अनेक राजकीय गुंडांना(gangster) ताब्यात घेतले असून काही फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे. भाजपचे मामा राजवाडे, नेते सुनील बागुल यांचा पुतण्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याचबरोबर शिवसेना (शिंदे गट) संबंधित कुख्यात गुंड पवन पवार आणि विशाल पवार यांवरही पोलिसांचा रडार केंद्रित आहे. पवन पवार यांच्यावर हत्या, खंडणी आणि हत्येच्या प्रयत्नासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अलिकडच्या काळात त्यांनी तयार केलेला रॅप साँग सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये ‘पीपी कंपनी’, ‘सीव्ही कंपनी’ आणि ‘गँगस्टर‘(gangster) या शब्दांचा उल्लेख आहे. या रॅप साँगमुळे दहशत माजवण्याच्या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पवन पवारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवन पवार हे माजी नगरसेवक असून त्यांच्या अनेक फोटो राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. रॅप साँग व्हायरल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत गुन्हा नोंदवला. सध्या पवन पवार फरार असून पोलिसांकडून त्याचा सतत शोध सुरू आहे. त्यांच्या नावावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, नाशिक पोलिस या प्रकरणात कठोर कारवाई करत आहेत.
हेही वाचा :
प्रेमानंद महाराजांचे नाव घेत टाकलं जाळं, महिलेवर पाशवी बलात्कार…
काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरे यांचीच इच्छा… संजय राऊत यांचं…
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात शाहरुख – काजोलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल…