शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मुंबईतील भांडुप येथील फोर्टिज हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी येथे रक्त तपासणी केली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, अचानक अस्वस्थ वाटल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्याची निर्णय घेतला गेला. डॉक्टरांची देखरेख सुरू असून, त्यांची प्रकृती(condition) कशी आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळीच संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत त्यांनी राज ठाकरे यांची इच्छा आहे की महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला देखील सोबत घेणे गरजेचे असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचे चित्र स्पष्ट होत आहे.

संजय राऊत हे शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जातात. 2019 साली उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतचा सामंजस्य सोडून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केल्यापासून त्यांनी सातत्याने ठाकरे गटाची बाजू प्रभावीपणे मांडली आहे. विरोधकांवर टीकेचा वार करण्यापासून ते पक्षाचा अजेंडा मांडण्यापर्यंत संजय राऊत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

अद्याप संजय राऊतांना अचानक अस्वस्थ वाटण्याचे कारण (condition)स्पष्ट झालेले नाही. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीची तपासणी करत आहेत, आणि यावर आधारित पुढील माहिती लवकरच समोर येणार आहे. राजकीय वर्तुळात संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

प्रेमानंद महाराजांचे नाव घेत टाकलं जाळं, महिलेवर पाशवी बलात्कार…
काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरे यांचीच इच्छा… संजय राऊत यांचं…
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात शाहरुख – काजोलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल…