महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेल्या अनेक योजना(schemes) आता बंद झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये विशेष लक्ष वेधले आहे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या योजनेवर. याशिवाय, शिक्षण विभागातील स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एक गणवेश, पुस्तकाला वह्यांची पान यांसारख्या योजनाही मागे घेण्यात आल्या आहेत.

राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास, आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यासाठी 5 डिसेंबर 2023 रोजी सुरू झालेली मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा योजना, 2023 शैक्षणिक वर्षात राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर स्पर्धा आयोजित करून लाखो रुपयांची पारितोषिके देऊन राबवली गेली होती. मात्र, यंदा या योजनेला अद्याप सुरुवात झाली नाही.
या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी(schemes) टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, सामान्यांना कणभर लाभ देणाऱ्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. तसेच, कटप्रमुख सरकारी योजनांवर बोलत नसून फक्त बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
बंद झालेल्या योजनांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
आनंदाचा शिधा – बंद
माझी सुंदर शाळा – बंद
१ रुपयात पीकविमा – बंद
स्वच्छता मॉनिटर – बंद
१ राज्य १ गणवेश – बंद
लाडक्या भावाला अपरेंटीसशिप – बंद
योजनादूत योजना – बंद
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना – बंद
अंबादास दानवे म्हणाले की, निवडणुकांपूर्वी या सर्व योजनांचा भंपकपणा जनतेपुढे उघड करणार आहेत. या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रातील आणि सामान्य नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
हेही वाचा :
संजय राऊतांची प्रकृती बिघडली, तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल…
दिवाळी धमाका! केवळ 3578 रुपयांत घरी घेऊन या नवा ‘iPhone 17’
आधार कार्ड अपडेट करायचं? घरबसल्या नाव, पत्ता अन् फोटो बदला….