महाराष्ट्रात यंदाच्या मान्सून हंगामाचा शेवटचा टप्पा गाठतानाही पावसाची तीव्रता कमी झालेली नाही. मे महिन्याच्या अखेरीपासून राज्यभर जोरदार पाऊस सुरू झाला होता. जून-जुलैमध्ये मध्यम पाऊस(rain) तर ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाने कहर केला. सप्टेंबरमध्ये मान्सून ओसरेल अशी अपेक्षा होती, पण विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, पिकं पाण्याखाली गेली आणि घरे उद्ध्वस्त झाली.

आता ऑक्टोबरमध्ये मान्सून माघारी जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच, हवामान खात्याने नवीन इशारा जारी केला आहे. ताज्या अंदाजानुसार, 15 ते 18 ऑक्टोबरदरम्यान राज्यात पावसाची(rain) आणखी एक जोरदार फेरी येण्याची शक्यता आहे.हवामान खात्याच्या अहवालानुसार विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल. काही भागात विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता.खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर दिसेल.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. कापणी झालेलं पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावं आणि वाऱ्यापासून किंवा पावसापासून बचाव करण्याची योग्य तयारी ठेवावी, असं सूचित करण्यात आलं आहे.मुंबई आणि पुण्यासह राज्यातील अनेक भागात ऑक्टोबरच्या सुरुवातीला पावसाळ्याच्या(rain) समाप्तीची अपेक्षा होती. मुंबईत तर हवामान खात्याने मान्सूनच्या माघारीची अधिकृत घोषणा देखील केली होती. मात्र, नवीन हवामान बदलाच्या संकेतांमुळे पुन्हा एकदा राज्यात गडगडाटी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.नागरिक आणि शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस सतर्क राहावं, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

हेही वाचा :

5 शेअर्सवर 3 नवीन शेअर्स मोफत,
शुभमन गिलच्या ‘सेनेला’ दिले खुले आव्हान!
देशातील सर्वात स्वस्त कारची चावी तुमच्या हातात