धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे मुलीचे लग्न पार पाडून घरी परतलेल्या दांपत्याची त्यांच्या मुलाने मुसळाने वार करून हत्या केली. पत्नीसमोर सुनावल्याच्या रागातून आरोपीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय आहे.

शिरपूरच्या महावीर सोसायटीत मुलाने आई-वडिलांची हत्या केल्याची घटना घडली.पत्नीसमोर सुनावल्याच्या रागातून आरोपीने मुसळाने दोघांवर हल्ला केला.पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
धुळे: धुळे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या आई वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नीसमोर रागावल्याने ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. (Shirpur) घडलेली घटना शिरपूर परिसरातील महावीर सोसायटीत घडली.रुग्णालयात सापडलेला ‘तो’ बॉम्ब नव्हताच! पुणे पोलिसांची घाई; एटीएसलाही कळविले नाही
या प्रकरणात हत्या झालेल्या आईचे नाव रंजू देवी तर वडिलांचे नाव इंदाराम असे आहे. शुक्रवारी आपल्या मुलीचे लग्न पार पाडून हे दोघेही दाम्पत्य आनंदाने घरी परतले. (Shirpur) मात्र घरी आल्यानंतर कोणत्यातरी कारणावरून आई वडिलांनी मुलाला त्याच्या पत्नीसमोर सुनावले. या अपमानाचा राग अनावर झाल्याने संशयित आरोपी मुलाने रागाच्या भारत थेट घरात ठेवलेल्या मुसळाने दोघांच्याही डोक्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने इंदाराम आणि रंजू देवी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या अनपेक्षित आणि क्रूर हल्ल्यानंतर संशयित आरोपी मुलाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरडाओरडा ऐकून परिसरातिल नागरिक जमा झाले होते. जागरूक नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्याला शिताफीने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. (Shirpur) पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई आणि तपास सुरु आहे. या घटनेने धुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.‘फोन का नाही केला?’ याचा संताप आणि पत्नीची दगडाने ठेचून हत्या धुळे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची दगडाने ठेचून हत्या कल्याचे समोर आले आहे. बाहेरगावी गेल्यावर पत्नीने फोन का केला नाही या क्षुल्लक कारणावरून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शिरपूर तालुक्यातील खैरखुटी इथं शेकड्या पाडा भागात घडली.
हेही वाचा
राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा
पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट
सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी