NEET परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य तिघांनी संपवलं जीवन, CBIचं धाडसत्र सुरू

NEET पेपरफुटीनंतर परीक्षा रद्द झाल्याने देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचं वातावरण निर्माण झालं आहे. दिल्ली, राजस्थान आणि गोव्यात तिघा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून CBIचा तपास वेगात सुरू आहे.

दिल्ली, राजस्थान आणि गोव्यात तिघा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना समोर आल्या. लातूर, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये CBIने ट्युशन क्लास चालकांवर छापे टाकले. NEET परीक्षा ३ मे रोजी वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेचा पेपर देशभरात घेण्यात येणार होता. मात्र परीक्षेपूर्वी पेपर फुटल्याने एनटीएने ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. (NEET exam) यामुळे ही परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं व नैराश्याचं वातावरण निर्माण झाला. या नैराश्यातून ३ विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवल्याचे समोर आले आहे.
काय घडलं नेमक?

भविष्यात डॉक्टर बनण्याचं स्वप्न घेऊन दोन किंवा त्याहून जास्त वर्ष विध्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी तयारी करतात. मात्र परीक्षेपूर्वीच पेप्पर फुटल्याने एनटीएने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनही झालीत. मात्र, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करत एनटीएने हीच परीक्षा रद्द केली. याच निर्णयाच्या नैराश्यातून उत्तर पश्चिम दिल्ली, राजस्थान, गोवा या तीन ठिकाणी तीन विध्यार्थ्यानी आत्महत्या केली.दिल्लीतील आदरास नगर परिसरात नुकतीच निटची परीक्षा दिलेल्या एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. या विद्यार्थिनीने यावेळेस या परीक्षेत चांगले मार्क्स मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र त्याने आता टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. राजस्थानच्या सिकर मधील एका 22 वर्षीय प्रदीप मेघवाल या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. प्रदीपने यापूर्वी दोन वेळेस ही परीक्षा दिली होती. (NEET exam) मात्र, यावेळी त्याने या परीक्षेत 650 मार्क मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. तर गोवा राज्यातीलही एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

या नीट पेपरफुटीनंतर लातूरमध्ये CBIचं धाडसत्र सुरूच आहे. नीट पेपर लीक प्रकरणात एका खासगी ट्युशन चालकाच्या संबंधित संस्थांवर पुण्यातील हडपसर आणि पिंपरी- चिंचवड परिसरातील सीबीआयने धाडी टाकल्या. सीबीआयच्या पथकाने संबंधित ठिकाणी जवळपास एक दीड तास करत कागदपत्रे आणि इतर महत्वाची माहिती पडताळून पहिली. सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णीला अटक केल्यानंतर आता सुतमील परिसरातील एका खाजगी ट्युशन चालकाच्या घरी सीबीआयच्या पथकाने छापा टाकला. क्लास चालकाच्या घरी सीबीआयनं 11 तास तपासणी केली. क्लास चालकाकडे आढळलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. मोबाईल, संगणक आणि विद्यार्थ्यांशी संबंधित नोंदींचीही पडताळणी करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. (NEET exam) त्याचप्रमाणे ज्या भागात त्यांची ट्युशन चालते त्या ठिकाणी पथकाने जाऊन अनेक नोंदी घेतल्या. सुमारे 11 तास तपासणी केल्यानंतर सीबीआयचे पथक काही कागदपत्रे आणि माहिती सोबत घेऊन निघून गेले. मात्र, पुढील कारवाईबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा

राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा

पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट

सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी