केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं देशातील ऋतूचक्रात पुन्हा एकदा बदल अपेक्षित असून, 10 राज्यांना या धर्तीवर सावधगिरी आणि सतर्कतेचा इशारा दिला आहे. यादरम्यान वादळी पावसाची शक्यतासुद्धा वर्तवण्यात आली आहे.

अंदमान आणि निकोबार बेट समुहामध्ये पावसासाठी किंबहुना मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असतानाच देशातील काही राज्यांना उष्णतेची लाट, तर काहींना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीच्या माहितीनुसार दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानात उष्णतेचा कहर जाणवेस. तर, पूर्वोत्तर भारतामध्ये मात्र पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून येईल. देशातील 10 राज्. वादळाच्या रडारवर असून, यादरम्यान वाऱ्याचा वेग 70 ते 80 किमी प्रतितास इतका असू शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. वादळी वाऱ्यांदरम्यान नागरिकांना वृक्षांखाली, मोकळ्या भागात किंवा हलक्या पत्र्याच्या आडोशाला उभं न राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पावसाच्या ढगांची एंट्री पण, उष्णता कायम इथं महाराष्ट्रातही हवामानाची संमिश्र स्थितीच पाहायला मिळत आहे. राज्यात एकिकडे प्रचंड तापमानवाढ, उष्मा आणि आर्द्रतेमुळं हा उन्हाळा असह्य झाला आहे. तर, पुढील 24 तासांमध्ये त्याचा कडेलोट होण्याची शक्यता आहे. विदर्भासह मराठवाड्यात हवामान विभागानं उष्णतेत आणखी वाढ होईल असं सांगितलंय, तर कोकणात दमट हवा बेजार करेल. दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागांमध्ये वादळी पावसाचीसुद्धा हजेरी असू शकते, (warning) ज्यामुळं या भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यात प्रामुख्यानं धाराशिव लातूर इथं पावसाला वादळी किनार मिळण्याची शक्यता आहे.(warning) तर मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उष्मा हैराण करेल, मात्र मधूनच दाटून येणारे काळे ढग पाहता हा पाऊस आज पडतो की काय? असाच प्रश्न नागरिक आभाळाकडे पाहून विचारत आहेत. राज्यात घाटमाथ्यावर सूर्य मावळतीला गेल्यानंतर वारे सुटतील तर, आभाळात विविध रंगांच्या छटा पाहायला मिळतील, जणू मान्सूनच्या येण्याची चाहूलच देऊन जातील.
सहलीला जाताय? काळजी घ्या बंगालच्या उपसागरामध्ये नैऋत्येला कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. इथपासून तामिळनाडू, कर्नाटक ते अगदी मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र विस्तारलं असल्यानं दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. सध्याचे सुट्टीचे दिवस पाहता अनेकांचीच पावलं देशातील काही गिरीस्थानांकडे वळत आहेत. मात्र, तिथं हवामानात काही बिघाड होण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये हिमाचलल प्रदेशच्या काही भागांमध्ये वादळी वारे आणि अतीव पर्वतीय भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. कांगड़ा, चंबा, मंडी, ऊना, बिलासपुर, सोलन आणि शिमला इशं वादळी पाऊस नागरिकांना अडचणीत आणू शकतो. तिथं पंजाबमध्येसुद्धा अमृतसर, मोहाली, बठिंडा, मनसा, कपूरथला, मोगा, बरनालामध्ये पावसाची हजेरी नाकारता येत नाही.
यंदा केरळमध्ये 26 मे रोजी मान्सून दाखल होणार यंदाच्या वर्षी मोसमी पाऊस वेळेपूर्वी दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असू केरळात तो (Kerala) 26 मे रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. (warning) यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा
राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा
पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट
सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी