मुंबईतील सर्वच कन्स्ट्रक्शन बंद करा राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरून महायुती आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. त्याचबरोबर मुंबईतील सर्वच कंट्रक्शन बंद करा, अशी मागणी ठाकरेंनी केली.पुण्यात काही दिवसांपूर्वी पुणे-मुंबई मिसिंग लिंकवर दरड कोसळण्याच्या घटना घडली. दोन-तीन महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या ऐतिहासिक मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा खाली कोसळला होता. या दुर्घटनेनंतर 19 तासांनी मार्गिका पुन्हा खुली झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला. राज ठाकरे यांच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Raj Thackeray) त्यानंतर राज ठाकरेंनी मुंबईतील सर्वच कन्स्ट्रक्शन बंद करा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

पुणे-मिसिंग लिंकवर काही दिवसांपूर्वी पहाटे चार वाजता दरड कोसळली होती. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नव्हती. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी महायुती सरकारला लक्ष्य केलं. विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी विधीमंडळात आक्रमक पवित्रा घेतला. माझ्यावर टीका केली तरी चालेल. परंतु महाराष्ट्राची बदनामी खपवून घेणार नाही, अशा शब्दात फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं होतं. (Raj Thackeray) त्याचाही समाचार राज ठाकरेंनी भाषणातून घेतला. तसेच फडणवीसांनी मिसिंग लिंकवर केलेल्या कौतुकावरही ठाकरेंनी निशाणा साधला.

मिसिंग लिकंवरून फडणवीसांना टोला लगावताना राज ठाकरे म्हणाले, ‘ माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना सर्व कंन्स्ट्रक्शन बंद करा. फ्लायओव्हर ब्रिज म्हणजे विकास नाही. परदेशात जाऊन काय करतात. तिथली शहरं बघा. इमारती वाढत आहे. कसंही बांधकाम होत आहे. १ मे रोजी मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं. (Raj Thackeray) आता त्याचा पिलर पडला. मे जून जुलै. जुलै पूर्णही झाला नाही. ६०-६५ दिवसात नवीन बांधलेला टनेल गळतो आणि काही तरी सांगतात. कॅनडातून रिसर्च केला. इंडोनेशियातून हे आणलं, जर्मनीतून अजून काही केलं आणि मग भारतीय कंत्राटदाराने तो बनवला. त्यांनाच द्यायचा ना. नितीन सरदेसाई म्हणाले, मला राज कपूरचं गाणं आठवलं. मेरा जुता है जपानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. कंत्राटदार आपलाच. तो बरबाद करणार. काळजी करू नका’.

‘नव्या कंत्राटदारांना ५६ टक्के द्यावे लागते. मग असेच रस्ते आणि खड्डे मिळणार. आपल्या कंत्राटदारांचं कामच नाही ते. १८०० सालात व्हिटी स्टेशन बांधलं. तेव्हा मुंबईची लोकसंख्याही तेवढी नव्हती. तेव्हाचं स्टेशन आज लोकांना पुरतं. इतकी लोकसंख्या वाढूनही. याला म्हणतात व्हिजन. लोकांना काय पाहिजे हे १८०० सालात त्यांना कळलं. अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग बघा. इंटरनेटवर बघा. ती एम्पायर स्टेट बिल्डिंग १९३३ साली बांधली. ११० मजली इमारत आहे. या हॉलच्या पाच सहा पट रुंद असेल. एवढा मोठा मजला आहे. किती वर्ष लागली बांधायला. त्या इमारतीत ग्राऊंड फ्लोअरला बॉम्बस्फोट झाला. छोटं विमान आदळलं. आजही ताठ मानेने उभी आहे. १४ महिन्यात ती इमारत बांधली. तिला आजही काही होत नाही. त्यांची ब्रीज आणि पूल पाहा. ब्रिटिशांच्या काळात ब्रिजेस बांधले. आजही इंग्लंडवरून आजही पत्र येतात. आम्ही अमूक ठिकाणी ब्रीज बांधला होता. त्याची १०० वर्षाची आमची गॅरंटी संपली आहे. आता तो तुम्ही बघा, अशी पत्र येतात. १९४७ ला ब्रिटिश गेले. त्या आधी दीडशे वर्ष राज्य केलं. तेव्हाचे ब्रीज आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा :

कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?

क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?