रात्री पूर्ण झोप घेऊनही थकवा जाणवतोय? 5 संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो गंभीर आजार?

आजच्या आधुनिक आणि वेगवान जीवनशैलीत चुकीचा आहार, अतिताण आणि पॅकेज्ड फूडच्या (अन्नपदार्थ) अतिवापरामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. सर्वात मोठी अडचण म्हणजे ही लक्षणे शरीरात इतक्या संथ गतीने आणि सौम्य स्वरूपात दिसू लागतात की, सामान्यतः नागरिक त्यांच्याकडे सुरुवातीला पूर्णपणे दुर्लक्ष करतात.

शरीरातील अंतर्गत कमतरतेची ५ प्रमुख लक्षणे:
१. सतत जाणवणारा थकवा व सुस्ती: रात्री ७ ते ८ तासांची पूर्ण आणि शांत झोप घेतल्यानंतरही जर सकाळी उठल्यावर शरीरात प्रचंड सुस्ती किंवा थकवा जाणवत असेल, तर ते जीवनसत्त्वांच्या कमतरतेचे मुख्य लक्षण आहे. (malnutrition) याचा थेट परिणाम व्यक्तीची कार्यक्षमता आणि ऊर्जेवर होतो.

२. केसांचे अवाजवी गळणे: ऋतू बदलताना किरकोळ केस गळणे नैसर्गिक आहे; मात्र जर केस सतत आणि मोठ्या प्रमाणावर गळत असतील, तर ते शरीरातील अंतर्गत पोषणाच्या अभावाचे लक्षण आहे. योग्य पोषण न मिळाल्यास केसांच्या मुळांचे नैसर्गिक वाढीचे चक्र बिघडते.

३. तोंडात फोड येणे आणि ओठ फुटणे: अनेकदा तोंडात वारंवार येणारे छाले (फोड) किंवा ओठ फुटण्याच्या समस्येकडे लोक किरकोळ उष्णता म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र, हे शरीरातील जीवनसत्त्वांच्या कमतरतेचे स्पष्ट संकेत आहेत, (malnutrition) ज्यावर केवळ बाह्य मलम लावण्याऐवजी अंतर्गत पोषण सुधारणे गरजेचे असते.

४. हात-पायांना मुंग्या येणे किंवा बधिरता: हात आणि पायांच्या बोटांमध्ये वारंवार सुया टोचल्यासारख्या मुंग्या येणे किंवा अवयव बधिर होणे या लक्षणाकडे कधीही दुर्लक्ष करू नये. हे थेट मज्जातंतूंच्या कमकुवतपणाशी किंवा नुकसानीशी संबंधित असू शकते.

५. त्वचेचा फिकटपणा आणि ठिसूळ नखे: जर चेहऱ्याची नैसर्गिक चमक जाऊन त्वचा फिकट दिसत असेल किंवा हाताची नखे अत्यंत ठिसूळ होऊन वारंवार तुटत असतील, तर हे शरीरात लोहाच्या किंवा आवश्यक जीवनसत्त्वांच्या कमतरतेचे लक्षण आहे.

शरीरातील कोणत्याही प्रकारची पौष्टिक कमतरता एका साध्या रक्त तपासणीद्वारेसहज शोधून काढता येते. (malnutrition) वेळेत निदान झाल्यास केवळ आहारात योग्य बदल करून किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक सप्लिमेंट्स (पूरक आहार) घेऊन ही समस्या पूर्णपणे बरी होऊ शकते. आपल्या शरीराने दिलेले हे सूक्ष्म संकेत ओळखणे, हेच उत्तम आरोग्याचे पहिले पाऊल आहे.

हेही वाचा :

कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?

क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?