देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली असून, त्याचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. इंधन दरवाढीमुळे अनेक वस्तू महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे, या वाढीचा परिणाम एसटी प्रवासावरही होण्याची शक्यता आहे. (Petrol and diesel) काही दिवसांपूर्वीच एसटीच्या तिकीटदरात वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा डिझेलचे दर वाढल्याने आणखी भाडेवाढ होण्याचे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या ‘लालपरी’लाही आता महागाईचे चटके बसू लागले आहेत. डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर तब्बल १२५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. (Petrol and diesel) परिणामी, आगामी काळात एसटी बसच्या तिकीटदरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज भाडेवाढीची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
सध्या एसटी महामंडळाला महिला सन्मान योजना, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा मोफत प्रवास तसेच दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या सवलतींचा परतावा राज्य सरकारकडून मिळतो. मात्र, नवीन बस खरेदी असो किंवा बसस्थानकांचे नूतनीकरण, प्रत्येक कामासाठी महामंडळाला शासनावर अवलंबून राहावे लागते. शासनाकडून किती काळ आणि किती निधी घ्यायचा? महामंडळाने आता आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दिशेने पावले उचलली पाहिजेत, असे मत सरनाईक यांनी व्यक्त केले. “काही निर्णय कटू असले तरी ते घेणे आवश्यक आहे. महागाई ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहता महामंडळासाठी ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे,” असेही त्यांनी नमूद केले. (Petrol and diesel) त्यामुळे येत्या काळात एसटीच्या तिकीटदरात पुन्हा वाढ होते का, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा
राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा
पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट
सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी